किसान सन्मान योजनेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:14+5:302021-01-13T05:16:14+5:30
रस्त्यावरील खड्यांमुळे अपघाताची शक्यता गोरेगाव : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता ...

किसान सन्मान योजनेपासून वंचित
रस्त्यावरील खड्यांमुळे अपघाताची शक्यता
गोरेगाव : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्यामध्ये भरण घालण्यात आले असले तरी ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
विडी उद्योगांवर उतरती कळा
तिरोडा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात एकेकाळी मोठ्या उद्योगांना आव्हान देणाऱ्या बिडी उद्योगावर उतरती कळा आली आहे. हे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. हजारो बिडी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. जिल्ह्यातील तेंदूपत्ता उद्योगाला वाव मिळाल्यास या मजुरांच्या पोटापाण्याची समस्या सुटणार आहे.
रस्ता बांधकामाच्या चौकशीची मागणी
अर्जुनी-मोरगाव : परिसरात निम्याहून अधिक रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत डांबरीकरण करण्यात आले आहे. बहुतांश डांबरीकरण रस्त्यावर महिनाभरात खड्डे पडली आहेत. या रस्त्यांना खड्ड्यात पॅचेस लावले जात आहेत. अल्प कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. या संपूर्ण रस्ते बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सततच्या नुकसानीने शेतकरी धास्तावला
परसवाडा : धान पीक काढणीला आले असतानाच कीडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. असाच खरीपाचा डाव हरलेला शेतकरी आडवा पडलेल्या धानाच्या पिकावर डोक्यावर हात ठेवत खिन्न होऊन पीकावरच विसावला आहे. परतीच्या पावसाने धान पिकांची अवस्था वाईट झाली. कधी पाऊस तर कधी किडरोग यामुळे शेतकरी धास्तावलेला आहे.
ठाकरे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
बोंडगावदेवी : जवळील ग्राम पिंपळगाव-खांबी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत कार्यरत सहायक शिक्षक धनराज ठाकरे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सपत्नीक सत्कार करुन निरोप दिला.