किडंगीपार येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: September 17, 2015 02:17 IST2015-09-17T02:17:55+5:302015-09-17T02:17:55+5:30

किडंगीपार येथे एक वयस्कर व एक शाळकरी मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने ग्रामीण जनतेत डेंग्यूचा ...

Dengue infestation at Kedangipar | किडंगीपार येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव

किडंगीपार येथे डेंग्यूचा प्रादुर्भाव

आमगाव : किडंगीपार येथे एक वयस्कर व एक शाळकरी मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने ग्रामीण जनतेत डेंग्यूचा आजार असल्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे किडंगीपार येथे वैद्यकीय चमूने घराघरात जावून तपासणी मोहीम सुरु केली आहे. पं.स. सभापती हेमलता संजय डोये व पं.स. सदस्य अशोक पटले यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी शंभरकर यांच्यासोबत डेंग्यू आजारासंदर्भात चर्चा केली.
सोमवारी १४ सप्टेंबर रोजी किडंगीपार येथील रुकमा काशीराम मेंढे (४५) या महिलेची सायंकाळी अचानक प्रकृती बिघडली. तिच्यावर खासगी उपचार करण्यात आला. मात्र तिचा मृत्यू १५ सप्टेंबर रोजी सकाळी झाला. तिच्या तोंडातून व नाकातून रक्त निघत असल्याचे सांगण्यात आले.
१३ सप्टेंबर रोजी मयुरी सुरेश मडावी (११) या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या तोंडातून व नाकातून रक्त निघत होते. १५ सप्टेंबरला सरस्वता मारूती रहिले (४५) या महिलेस ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे भर्ती करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच खासगी रुग्णालयात एक रुग्ण दाखल आहे. गोंदिया येथे तीन रुग्ण उपचाराकरिता हलविण्यात आले आहेत.
किडंगीपार येथे ठाणा प्राथमिक केंद्राची चमू रुग्णाची तपासणी करीत आहेत. काही अंशी डेंग्यूचा प्रादुर्भात असल्याचे निदर्शनास आल्याचे समजते. पंचायत समिती सभापती हेमलता डोये, संजय डोये, तिगाव पं.स. सदस्य अशोक पटले यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन या संदर्भात चौकशी करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ उपचार करण्याचे निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dengue infestation at Kedangipar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.