साखरीटोला येथे पाणी व हायमास्ट दिव्याची मागणी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:26 IST2021-02-20T05:26:13+5:302021-02-20T05:26:13+5:30
साखरीटोला : येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या असून, अद्यापही ही समस्या पूर्णतः सोडविण्यात आलेली नाही. ...

साखरीटोला येथे पाणी व हायमास्ट दिव्याची मागणी ()
साखरीटोला : येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या असून, अद्यापही ही समस्या पूर्णतः सोडविण्यात आलेली नाही. बुधवारी (दि. १७) संबंधित रस्त्याचे कंत्राटदार व व्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत प्रभागातील समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी १ महिन्याच्या आत पाण्याची समस्या पूर्णतः मार्गी लागेल, असे कंपनीने सांगितले. गावात हायमास्ट दिवा बसविण्याची मागणी यावेळी कंपनीचे अधिकारी विवेक मिश्रा, रोहित बाथम यांच्याकडे करण्यात आली. या बैठकीला सरपंच नरेश कावरे, सदस्य डॉ. अजय ऊमाटे, गौरव कोडापे, भाजपचे जिल्हा व्यापारी आघाडी महामंत्री सुनील अग्रवाल, भाजप युवा मोर्चा महामंत्री देवराम चुटे, व्यापारी आघाडी तालुका उपाध्यक्ष आशिष अग्रवाल, विशाल चकोले, अरफाज पठाण, सचिव ओ. के. रहांगडाले आदी उपस्थित होते.