शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

डासांना नष्ट करण्यासाठी फवारणी करण्याची मागणी

By admin | Updated: October 21, 2014 22:55 IST

नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे.

गोंदिया : नगर परिषदेचा आरोग्य विभाग सध्या गाढ झोपेत आहे. या विभागाला शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. मात्र याची झळ शहरातील नारिकांना सहन करावी लागत आहे. शहरवासी सध्या वेगळ्या समस्येला तोंड देत आहेत. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने शहरवासी त्रस्त झाले असून त्यांना रात्री झोपणे देखील अवघड झाले आहे. अशात डेंग्यूच्या प्रकोपाने शहरवासीयांत दहशत निर्माण झाली असून डांसावर आळा घालण्यासाठी पालिकेने सफाई व फवारणी अभियान राबवावे, अशी मागणी शहरवासी करीत आहेत. यावर्षी हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी थंडीचे प्रमाण बरेच कमी आहे. सध्या धान कापणीचा हंगाम जोमात आहे. या काळात धान पिकांवर किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. धान कापणीला काही काळ अकाली पावसामुळे विलंब झाला होता. यामुळे धान पिकांवरील डास शहरात पसरले. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. थंडी पडत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे बोलल्या जात आहे. गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत सदैव उदासीन आहे. शहरातील केरकचऱ्याची व नाल्यांची नियमितपणे साफ-सफाई केली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे अस्तव्यस्त स्वरूपात पसरले आहेत. यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. या घाणीच्या प्रादुर्भावामुळे डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. रात्रीच्या वेळेस डास व किड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शहरवासीयांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस घरातील दिवे सुरू ठेवणे देखील शहरवासीयांना अवघड झाले आहे. हे किडे चावा घेत असल्याने घरातील बालगोपाल. असुरक्षीत आहेत. किड्यांचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात कधीच नव्हता. यावर्षी थंडी कमी असल्याने व उष्णतेचे प्रमाण अजूनही काही प्रमाणात कायम असल्याने किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्या असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये आहे. कुठल्याही चौकात सध्या किडे हा चर्चेचा विषय झाला आहे. अद्यापही नगर परिषदेच्या वतीने शहरात डासनाशक फवारणी करण्यात नसल्याने शहरवासीयांमध्ये नगर प्रशासनाप्रति रोष आहे. शहरातील गटारांची व केरकचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाची आहे. मात्र या विभागाकडून अद्यापही शहरातील केरकचऱ्याची व नाल्यांची साफसफाई न करण्यात आल्याने डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातल्या त्यात शहरातील सिव्हील लाईंन्स परिसरात डेंग्यूने थैमान घातल्याने शहरवासीयांत अधिकच दहशत निर्माण झाली आहे. अशात पालिकेकडून मात्र अद्याप ठोस पाऊलण्यात आले नसल्याचे दिसून येते. बघावे तेथे कचरा पडून असल्याने पालिकेच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह लागतो. तरी शहरात डासनाशक फवारणी त्वरित करण्यात यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)