ग्रा.पं.कर्मचाऱ्यांची वेतनवाढीची मागणी मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:41+5:30

या वेळी दिलेल्या निवेदनातून राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतीमध्ये काम करित असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मागील ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी १० जुलै २०१८ रोजी नागपूर अधिवेशन काळात खापरी ते विधानभवन लाँग मार्च ३५ ते ४० हजार कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काढला होता.

Demand for salary increase of GRP employees | ग्रा.पं.कर्मचाऱ्यांची वेतनवाढीची मागणी मार्गी लावा

ग्रा.पं.कर्मचाऱ्यांची वेतनवाढीची मागणी मार्गी लावा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मागणी


लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनद्वारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी व निवृत्ती वेतनश्रेणीमध्ये वाढ व इतर मागण्याकरिता युनियनचे अध्यक्ष धनराज तुमसरे, सचिव छगनलाल अग्रेल यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतीमध्ये काम करित असलेल्या ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मागील ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी १० जुलै २०१८ रोजी नागपूर अधिवेशन काळात खापरी ते विधानभवन लाँग मार्च ३५ ते ४० हजार कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काढला होता. त्यावेळी तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे यांनी मांगण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ७ जानेवारी २०१९ ला लातूर येथील अधिवेशनात ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री यांनी मांगण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु या मागण्या अद्यापही मंजूर करण्यात आल्या नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, निवृत्तीवेतन पेन्शन लागू करण्यात यावे, उपदान लागू करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन ईपीएफ या कार्यालयात जमा करण्यात यावे, कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावे, ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या वेतनासाठी लाददेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी. आकृतीबंधात सुधारणा करण्यात यावी. आदि मांगण्याचा समावेश होता.
शिष्टमंडळात कार्याध्यक्ष माधव सेऊतकर, मुन्ना मेश्राम, सुनील भेलावे, मनोहर मेश्राम, प्रकाश रंगारी, नरेंद्र टेंभूरकर, तारा परसमोडे, देवेंद्र यावलकर, धर्मराज काळसर्पे, लोमेश गहाणे, देवेद्र शेंडे, भोजराज गिऱ्हेपूंजे, विठ्ठल शहारे, उमेश्वर पटले, सुरेश शहारे, श्रीपत धानगुप्ता, उमेंद्र चवरे, अंगद नागपुरे, रविंद्र मिसार, सुनील शहारे,पवन जांभूळकर, मिताराम पालेवार, लक्ष्मीचंद कटरे, रविशंकर टेंभरे, मच्छिंद्र उजवने यांचा समावेश होता.

Web Title: Demand for salary increase of GRP employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.