केशोरी येथे राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:57+5:302021-02-05T07:45:57+5:30
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या गावाची लोकसंख्या सहा हजाराच्या जवळपास असून या परिसरातील ३० ते ३५ गावाच्या व्यवहारासाठी केशोरी ...

केशोरी येथे राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या गावाची लोकसंख्या सहा हजाराच्या जवळपास असून या परिसरातील ३० ते ३५ गावाच्या व्यवहारासाठी केशोरी हे गाव केंद्रबिंदू आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक नसल्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, साामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी अर्जुनी-मोरगाव येथे राष्ट्रीयीकृत बँकेच्या कामासाठी जावे लागते. तेथे गेल्यानंतर गर्दी आणि वेळेवर निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे कामाशिवाय खाली हाताने परत यावे लागते. यामुळे आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. केशोरी या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा आहे. परंतु अशा अनेक शासकीय योजना आहेत. शासकीय योजनांच्या लाभासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे अनिवार्य असते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेसाठी तालुक्याच्या ठिकाणी अर्जुनी-मोरगाव येथे गेल्याशिवाय पर्याय नाही. या बँकेत गेल्यानंतर एक दिवसात काम होईलच असे नाही. कामाशिवाय अनेकदा विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना परत जावे लागत असल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. याकरिता केशोरी येथे राष्ट्रीयीकृत बँक शाखा सुरु करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.