मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:24 IST2021-01-15T04:24:19+5:302021-01-15T04:24:19+5:30
रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात गोंदिया : शहरासह तालुका मुख्यालयी सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य भर रस्त्यावर टाकले जाते. रेती, ...

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी
रस्त्यावरील बांधकाम साहित्याने अपघात
गोंदिया : शहरासह तालुका मुख्यालयी सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य भर रस्त्यावर टाकले जाते. रेती, गिट्टी, लोखंड रस्त्यांवर पडून राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. रेतीवरून अनेक वाहने घसरून पडत आहेत.
रस्ता रुंदीकरणात वृक्षांची कत्तल
सडक-अर्जुनी : शहरातील रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला असलेले डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत. या मार्गावर निंब आणि वडाची मोठाली झाडे होती. परंतु रस्त्याच्या नावाखाली ही झाडे तोडण्यात आली. मात्र यासाठी वृक्षप्रेमींनी आक्षेप घेतलेला नाही.
ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांत वाढ
गोरेगाव : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. काही गावांत चोरटे भरदिवसा शिरून चोरी करीत आहेत. अनेक ठिकाणी दुकाने, पानटपऱ्या, हॉटेल फोडून साहित्य लंपास केले जात आहे. मोठी रक्कम नसल्याने दुकानमालक तक्रार देण्यासही टाळाटाळ करीत आहेत.
मामा तलावाला अतिक्रमणाचा विळखा
अर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून शेतात जाण्यायेण्याचे मार्गही बंद झाले आहेत. अनेक तलावांचे आकारमान कमी होत असल्याने साठवण क्षमताही घटत आहे. जिल्ह्याची ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून असणारी ओळख आता संपुष्टात येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.