Demand for immediate assistance to farmers | शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी
शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी

ठळक मुद्देशासनाला निवेदन : लाखनीत काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात लाखनी तालुक्यात धान पिकाची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी धान कापलेला असताना शेतात पाणी साचले. धानपीकाची नासाडी झाली. शेतकरी चिंतातुर झाले असून त्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
लाखनी तालुका काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री तथा राज्याच्या मुख्य सचिवांना तहसीलदार लाखनी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून धानाला हेक्टरी ३५ हजार रुपये नुकसान सरसकट भरपाई मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अतिवृष्टीमुळे शेतकºयाांच्या घरांचे नुकसान झाले आहे अशांना नुकसान भरपाई द्यावी, पीकविमा तात्काळ देण्यात यावा, जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा.
वाढत्या महागाईवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने तातडीने उपाय करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आला आहेत.
ठिय्या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील गिरेपुंजे, शफीभाई लद्धानी, पप्पूभाऊ गिरेपुंजे, रुपलता जांभुळकर, लाखनी शहर अध्यक्ष विशाल तिरपुडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मिनाक्षी बोपचे, पं.स. लाखनीचे उपसभापती मोरेश्वरी पटले, पं.स. सदस्य दादु खोब्रागडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष कैलास भगत, रमेश खेडकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये आदींनी मनोगत व्यक्त केले.
या संचालन व आभार प्रदर्शन विशाल तिरपुडे यांनी केले. या ठिय्या आंदोलनाप्रसंगी शफीभाई लद्धानी, पप्पूभाऊ गिरेपुंजे, सुनील गिरेपुंजे, विशाल तिरपुडे, आकाश कोरे, खुशाल गिदमारे, पंकज शामकुवर, मोनाली गाढवे, विजय कापसे, उमराव आठोडे, फाल्गुन पाटील वाघाये, नगरसेवक भोला उईके, अनिल निर्वाण, अशोक चोले, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, महादेव गायधने, प्रदीप तीतीरमारे, शशिकांत भोयर, धनंजय तिरपुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for immediate assistance to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.