गोंदिया-कोहमारा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने सांबराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:01 IST2018-01-12T16:01:23+5:302018-01-12T16:01:50+5:30
गोंदिया-कोहमारा मार्गावर शुक्रवारी दुपारी एका अज्ञात वाहनाने सांबराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

गोंदिया-कोहमारा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने सांबराचा मृत्यू
ठळक मुद्देवन्य प्राण्यांच्या अपघाती मृत्यूमध्ये वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: गोंदिया-कोहमारा मार्गावर शुक्रवारी दुपारी एका अज्ञात वाहनाने सांबराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. पांढरीफाट्यापासून जवळ असलेल्या पळसगावाजवळ झाडाखाली हे सांबर जखमी व मृतावस्थेत नागरिकांना आढळून आले. त्याचे वय अंदाजे ४ वर्षांचे असल्याचे सांगितले जाते. सांबर रस्ता ओलांडताना हा अपघात झाला असावा असे म्हटले जाते. वन्य प्राण्यांचे अपघाती मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाल्याचेही दिसून येते. याच पद्दथीने एका हरिणाचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाला होता तर एक बिबटही रस्त्यावर अपघाताने ठार झाला होता.