रिसामा येथे थ्री सीटर खुर्च्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:44 IST2021-02-05T07:44:34+5:302021-02-05T07:44:34+5:30
उद्घाटन कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डब्ल्यू.एस. बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक डी.आर.चंदेल, एस.आर.लांजेवार,एल.एस.भुते, डी. एम.गौरे, मणिराम उईके, सचिव ए.टी.डुंभरे, उपाध्यक्ष टी.एस.गौतम, ...

रिसामा येथे थ्री सीटर खुर्च्याचे लोकार्पण
उद्घाटन कार्यक्रम समितीचे अध्यक्ष डब्ल्यू.एस. बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक डी.आर.चंदेल, एस.आर.लांजेवार,एल.एस.भुते, डी. एम.गौरे, मणिराम उईके, सचिव ए.टी.डुंभरे, उपाध्यक्ष टी.एस.गौतम, के.एम.रहांगडाले, कोषाध्यक्ष दिनेशकुमार चुटे, सहसचिव टेकचंद कटरे, एल.सी.पारधी व सदस्य, तसेच सिव्हिल लाइन सुधार समिती महिला कार्यकारिणी सर्व पदाधिकारी, सदस्या वृंद व युवा वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना एल.एस.भुते यांनी बालोद्यान परिसरात समितीच्या वतीने खेळीमेळीच्या वातावरणात सामाजिक उपकमांतर्गत स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम युवा पिढीसाठी व्यायाम साहित्य, लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, तसेच निरोगी आरोग्यासाठी योग अभ्यास वर्ग नियमित चालविण्यात येत आहेत. हे सर्वांसाठी प्रेरणादायक कार्य आहे, असे मोलाचे मनोगत व्यक्त केले. परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून समितीच्या वतीने संवर्धन करण्याचे कार्य सुरू आहे.