माहितीचा खजिना असलेली लोकजैविक नोंदवही समर्पित

By Admin | Updated: December 23, 2014 23:06 IST2014-12-23T23:06:59+5:302014-12-23T23:06:59+5:30

पश, पक्षी, किटक, वनस्पती यासह अन्य जैविक माहितींचा खजिना असलेली लोकजैविक विविधता नोंदवही महाराष्ट्र जैवविविधता मंडळ व जिल्हा जैविक विविधता व्यवस्थापन समितीला समर्पीत करण्यात आली.

Dedicated to philanthropic register with information treasure | माहितीचा खजिना असलेली लोकजैविक नोंदवही समर्पित

माहितीचा खजिना असलेली लोकजैविक नोंदवही समर्पित

गोंदिया : पश, पक्षी, किटक, वनस्पती यासह अन्य जैविक माहितींचा खजिना असलेली लोकजैविक विविधता नोंदवही महाराष्ट्र जैवविविधता मंडळ व जिल्हा जैविक विविधता व्यवस्थापन समितीला समर्पीत करण्यात आली. ग्राम सोदलागोंडी येथे २२ डिसेंबर रोजी यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्राम मुरदोली येथील जैवीक विविधता व्यवस्थापन समितीच्यावतीने तयार करण्यात आलेल्या लोक जैवीक विविधता नोंदवहीत २६ प्रकारचे मासे, २७ प्रकारचे स्तनधार जीव, ११९ प्रकारचे पक्षी, २८ प्रकारचे फुलपाखरू, २७२ प्रकारचे वनस्पती, सात प्रकारचे सर्प, पाच प्रकारच्या छिपकली, चार प्रकारचे बेडूक यासह कृषी विभागाशी संबंधीत माहितीचा समावेश आहे.
मुरदोलीची ही व्यवस्थापन समिती महाराष्ट्र जैवीक विविधता नियम २००८ नुसार तयार करण्यात आली असून राज्यातील पहिली नोंदवही तयार करणारी समिती ठरली आहे.
समितीने भारतीय वन्यजीव न्यासच्या तांत्रीक निर्देशानुसार ही नोंदवही तयार केली असून यासाठी भारतीय वन्यजीव न्यासचे अनिल कुमार, प्रफुल बांभूरकर, भवभुती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे, त्यांचे विद्यार्थी चंद्रकुमार पटले, तुरेंद्र लिल्हारे, मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोलीचे सहायक प्राध्यापक डॉ. लक्ष्मण नागपूरकर, जिल्हा कृषी उपनिदेशक अश्विनी बोमले यांच्यासह गावकरी व विशेतज्ञांचे सहकार्य घेण्यात आले आहे.
ग्राम सोदलागोंदी येथे आयोजित कार्यक्रमात राज्य जैव विविधता मंडळाचे सदस्य सचिव व अतिरीक्त प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. दिलीप सिंह, जिल्हा जैवीक विविधता व्यवस्थापन समिती सदस्य सचिव व उप वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, व्यवस्थापन समिती मुरदोलीचे अध्यक्ष शशेंद्र भगत सचिव कृष्णकांत लिल्हारे यांच्या नेतृत्वात या नोंदवहीचे समर्पण करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय वन्य जीव न्यासचे वरिष्ठ निदेशक डॉ. राहूल कौल, प्रबंधक डॉ. राजेंद्र मिश्रा, वरिष्ठ सल्लागार प्रफुल बांभूरकर, जापान टाईगर एंड एलिफेंट फंडचे प्रतिनिधी व जैव विविधता मंडळाचे सल्लागार डॉ. दिलीप गुजर, प्राचार्य डॉ. भुस्कुटे, चंद्रकुमार पटले, डॉ, खुणे, डॉ. लक्ष्मण नागपूरकर, वन परिक्षेत्र अधिकारी व्ही.एस.कदम, राऊंड आॅफीसर एस.के.जाधव, मुरदोली समितीच्या सदस्य अल्का काटेवार, उषा पिसदे व अन्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन किशोर पटले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शमीम अहमद, सौम्य दासगुप्ता, हिवराज राऊत यांच्यासह अन्य सदस्यांनी यासाठी सहकार्य केले.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Dedicated to philanthropic register with information treasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.