धानाच्या कोठारातच धानाची घट

By Admin | Updated: December 21, 2015 02:00 IST2015-12-21T02:00:24+5:302015-12-21T02:00:24+5:30

पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. वेळेवर पाऊस साथ देत नाही. दरवर्षी पिकांवर वाढणाऱ्या रोगांचा प्रकोप.

Decrease of the chest in the lecture area | धानाच्या कोठारातच धानाची घट

धानाच्या कोठारातच धानाची घट

उतारा धानपिकांचा : नैसर्गिक संकटात भरडला जातोय शेतकरी
देवानंद शहारे गोंदिया
पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. वेळेवर पाऊस साथ देत नाही. दरवर्षी पिकांवर वाढणाऱ्या रोगांचा प्रकोप. निसर्ग वेळी-अवेळी आपले रंग बदलत असल्यामुळे धानाचे कोठार म्हणून ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्यातच धानाचे उत्पादन घटत चालले आहे. मागील तीन वर्षांच्या मुख्य पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार जिल्ह्यात धान पीक घटत चालल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये बागायती (पाण्याखालील क्षेत्र) धान पिकांचे प्रतिहेक्टरी उत्पन्न २५८३.८१४ किगॅ्र असून सुकवणीनंतर हेक्टरी सरासरी उत्पन्न २४२५.१६८ किग्रॅ एवढे भरले. तर जिरायती (वरथेंबी पावसावर अवलंबून) क्षेत्रात प्रतिहेक्टरी उत्पन्न २३०२.९८६ किग्रॅ असून सुकवणीनंतर हेक्टरी सरासरी उत्पन्न २१६१.५८३ किग्रॅ एवढे भरले.
तर मागील वर्षी खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये बागायती (पाण्याखालील क्षेत्र) धान पिकांचे प्रतिहेक्टरी उत्पन्न ३३५२.०३८ किगॅ्र असून सुकवणीनंतर हेक्टरी सरासरी उत्पन्न ३१४६.२२३ किग्रॅ एवढे भरले होते. तसेच जिरायती (वरथेंबी पावसावर अवलंबून) क्षेत्रात प्रतिहेक्टरी उत्पन्न २८४२.५४२ किग्रॅ असून सुकवणीनंतर हेक्टरी सरासरी उत्पन्न २६६८.०१० किग्रॅ एवढे भरले होते.
यावरून मागील वर्षाच्या मुख्य पीक कापनी प्रयोगाच्या तुलनेत यंदा बागायती धान उत्पन्नात सरासरी प्रतिहेक्टरी ७६८.२२४ किग्रॅ घट झाली. तसेच सुकविल्यानंतरच्या धान उत्पन्नात सरासरी प्रतिहेक्टरी ७२१.०५५ किग्रॅ घट झाली. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिरायती धान उत्पन्नात सरासरी प्रतिहेक्टरी ५३९.५५६ किग्रॅ घट झाली व सुकविल्यानंतरची घट सरासरी प्रतिहेक्टरी ५०६.४२७ किग्र घट झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Decrease of the chest in the lecture area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.