अपघातातील ‘त्या’ जखमी मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: December 29, 2014 01:35 IST2014-12-29T01:35:53+5:302014-12-29T01:35:53+5:30
भरधाव वेगात असलेली दुचाकी झाडाला आदळून घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातातील ‘त्या’ जखमी मुलाचा मृत्यू
सालेकसा : भरधाव वेगात असलेली दुचाकी झाडाला आदळून घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत खोलगड येथे १९ Þडिसेंबर रोजी दुपारी ही घटना घडली होती. अपघातातील मृत मुलाचे नाव प्रदीप दीपचंद दसरिया (१४, रा. ब्राह्मणटोला) असे आहे.
कावराबांध येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे स्नेह संमेलन असल्याने कुणाल कटरे (१४,रा.खोलगड) या विद्यार्थ्याने घरून नाट्यप्रयोगात घालण्याचे कपडे घरून आणण्यासाठी मुख्याध्यापक एन.टी.निर्वीकार यांची दुचाकी एमएच ३५/एच १५७८ मागीतली होती. यावर कुणाल कटरे व अरूण मोहारे (१४) यांना घेऊन प्रदीप कुणालच्या घरून त्याचे स्नेह संमेलनातील नाट्यप्रयोगात वापरण्याचे कपडे घेऊन शाळेत परत जात होता.
मात्र खोलगड येथील वळणावर प्रदीपचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडाला आदळली होती. या अपघातात कुणाल व अरूण यांना किरकोळ मार लागला होता. तर प्रदीपच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोंदियाला पाठविण्यात आले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गोंदियातून नागपूरला पाठविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान २८ डिसेंबर रोजी सकाळी प्रदीपचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)