‘तिथे’ मृतकाच्या नातेवाईकांना मोजावे लागतात पैसे

By Admin | Updated: March 19, 2017 00:28 IST2017-03-19T00:28:55+5:302017-03-19T00:28:55+5:30

एखाद्याचा मृत्यू संयशयास्पद, कीटकनाशक औषध प्राशन करुन, अपघाताने किंवा इतर कोणत्याही कारणाने

The 'dead' relatives of the deceased have to pay | ‘तिथे’ मृतकाच्या नातेवाईकांना मोजावे लागतात पैसे

‘तिथे’ मृतकाच्या नातेवाईकांना मोजावे लागतात पैसे

अमरचंद ठवरे अर्जुनी मोरगाव
एखाद्याचा मृत्यू संयशयास्पद, कीटकनाशक औषध प्राशन करुन, अपघाताने किंवा इतर कोणत्याही कारणाने संशयास्पदरित्या झाल्यास त्याचे शवचिकित्सा करणे कायद्याने बंधनकारक आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अशा प्रकरणातील मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागते. खरे म्हणजे शवचिकित्सेची ही प्रक्रिया सरकारी यंत्रणेचे काम आहे, मात्र हे सोपस्कार करण्यासाठी अर्जुनी येथे मृतकांच्या नातेवाईकांना चक्क पैसे मोजावे लागत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, परिसरात संशयास्पदरित्या किंवा अपघाती मृत्यमुखी पडण्याच्या घटना अनेकदा घडतात. संशयास्पद, अपघात, आत्महत्या अशा पोलीस कारवाईच्या घटनांमध्ये प्रेताचे शवचिकित्सा करणे अनिवार्य असते. समजा एखादेवेळी अशी घटना एखाद्याच्या घरी घडली तर मृतकांच्या नातेवाईकांना दु:खामध्ये सुद्धा मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो.
प्रेत ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात आणण्यासाठी वाहनासह सर्व व्यवस्था मृतकांच्या नातेवाईकांना करावी लागते हे समजू शकतो, पण प्रेत शवगारात गेल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी त्या प्रेताची शवचिकित्सा करतात. शवगारात डॉक्टरांना सहकार्य करण्यासाठी एका स्वीपरची व्यवस्था सुद्धा केली जाते.
या ठिकाणी प्रेताची शवचिकित्सा करण्यासाठी २ हजारापासून पुढे मागणी मृतकाच्या नातेवाईकाकडे केली जाते. अनेकदा रुग्णालयात प्रेताची शवचिकित्सा करण्यासाठी स्वीपर उपलब्ध झाला नाही तर बाहेरगावावरुन व्यवस्था करावी लागते, अशी वेळ अनेकदा येते. ज्या घरचा माणूस मरतो, त्यांनाच प्रेताचे शवचिकित्सा करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, अशी ओरड आहे.
यासंबंधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेडे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी रुग्णालयात एक महिला व एक अपंग असलेला कर्मचारी स्वीपर म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. दोन्ही कर्मचारी रुग्णालयात काम करतात. पोस्टमार्टेम करताना डोकं, बॉडीची हालचाल करण्यासाठी दिव्यांग कर्मचाऱ्यास त्रास होत असल्याने दुसऱ्याकडून सहकार्य घेतले जाते.
रुग्णालयात कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रेताचे शवचिकित्सा करण्यासाठी खुद्द मृतकांच्या नातेवाईकांनाच ती सोय करावी लागते आणि हजार रुपये नगदी मोजून द्यावे लागतात. तेव्हा कुठे सोपस्कार होतात. मृतकांच्या नातेवाईकांची अडचण लक्षात घेता कार्यतत्पर स्वीपरची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

Web Title: The 'dead' relatives of the deceased have to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.