शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन शॉपिंग धोकादायक

By admin | Updated: May 9, 2015 23:53 IST

इंटरनेटमुळे व्यवहार करणे सुलभ झाले आहे. ही सुलभता आली असली, तरी अनेक धोकेही त्याबरोबर आले आहेत.

सायबर चोरट्यांची टोळी सक्रि य : सुलभतेसोबतच येतात धोके गोंदिया : इंटरनेटमुळे व्यवहार करणे सुलभ झाले आहे. ही सुलभता आली असली, तरी अनेक धोकेही त्याबरोबर आले आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाले आहेत. त्यांना केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेऊन घरबसल्या दरोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतही बदलली आहे. शारीरिक कष्ट घेण्यापेक्षा चोरट्यांना आता केवळ वेबसाईट हॅक करण्याचे ज्ञान मिळविणे इतकीच तसदी घ्यावी लागत असल्याने या क्षेत्रातही चोरट्यांची संख्या वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आॅनलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. आॅनलाईन म्हणजेच इंटरनेट शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घरबसल्या खरेदी असल्यामुळे बाजारातील गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते; परंतु आॅनलाईन शॉपिंगबद्दल लोकांच्या मनात शंकाकुशंका वाढत आहे. अनेकांची यामुळे झालेली फसवणूक आणि आॅनलाईनची विश्वासार्हता यामुळे ग्राहकही अडचणीत येत आहेत. स्वस्तातले स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सध्या खेड्यातील व्यक्तीही ब्राऊजिंग करून एकाच प्रकारातील शेकडो प्रॉडक्ट्स आॅनलाईन बघू शकतात. त्यामुळे पारंपरिक दुकानांमध्ये, स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जाऊन होणारा वेळेचा अपव्यय टळू शकतो. आॅनलाईन रिटेलिंगमुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. आॅनलाईन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे जे लोक रिटेलिंगपासून दूर होते ते आता जवळ आले आहेत. आॅनलाईन रिटेलर्स ग्राहकांना काहीशा वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. जे प्रॉडक्ट गावात मिळत नाही त्याचीही खरेदी करणे यामुळे शक्य झाले आहे. वेबसाईटमुळे आपण केव्हाही आॅनलाईन खरेदी करू शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहेत अशा लोकांनाही बसल्या जागी वस्तूंची खरेदी करता येते. तसेच खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर विविध प्रॉडक्ट्सबाबत संशोधन, तसेच त्यांच्या किंमतीमधील तुलना करू शकतो, जे विविध दुकानांना, स्टोअर्सला प्रत्यक्ष भेट देऊन करून घेणे अवघड असते.आॅनलाईन खरेदीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. आॅनलाईन रिटेलर्स जरी पारंपरिक दुकानांच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्टस्ची विक्र ी करीत असले, तरीही त्या प्रॉडक्ट्सच्या दर्जाबाबत आपल्याला कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जाऊन तुम्ही वस्तूची तत्काळ खरेदी करू शकता. याउलट वस्तू आॅनलाईन खरेदी केली, तर ती वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. आॅनलाईन वस्तू परत करणे अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो. दुकानांमध्ये वस्तू खरेदी करताना आपण ती वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन त्या वस्तूच्या दर्जाबाबत खात्री करून घेत असतो. याउलट आॅनलाईन वस्तू जरी आकर्षक व चमकदार वाटत असली, तरीही प्रत्यक्षात ती तशी असेलच असे नाही. आॅनलाईन खरेदीमध्ये वाहतुकीच्या खर्चाबाबत सुरुवातीला काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा शिपिंगचा म्हणजेच वाहतुकीचा अतिरिक्त खर्च या वस्तूच्या मूळ किंमतीत धरला जातो. आॅनलाईन खरेदीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. यात प्रॉडक्टसची विक्री करणाऱ्या तिसऱ्या पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची संभावना असते. यात हे विक्रेते खरेदीदारांकडून वस्तूंचे पैसे स्वीकारतात; परंतु त्या वस्तू घरी पाठवीत नाहीत. त्यामुळे आॅनलाईन शॉपिंग कितपत योग्य याचाही विचार करायला हवा. (शहर प्रतिनिधी)सुरक्षित खरेदी केली पाहिजेज्या योजना अतिशय आकर्षक वाटतात त्यांची खात्री करून घेणे महत्वाचे आहे. जर एखाद्या संकेतस्थळाबाबत खात्री वाटत नसल्यास मित्र, नातेवाईकांकडे त्याची चौकशी करा. इंटरनेटवर सर्च करून त्या साईटबद्दलची मते जाणून घ्या आणि नंतरच खरेदीचा बेत आखावा. नाही तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. ज्या वस्तू खरेदी करावयाच्या आहेत, त्याचे आधी पैसे भरू नका. वस्तू घरी आली की पैसे द्यावेत. तसेच आॅनलाईन पैसे भरण्यापूर्वी तुम्हाला पासवर्ड विचारला जातो जेणेकरून तुमची वैयिक्तक माहिती गोपनीय राहील. हा पासवर्ड निवडताना तुम्ही अक्षरे, अंक आणि चिन्हे यांची सरमिसळ केली पाहिजे. सार्वजनिक जागांवर वायफाय असलेल्या ठिकाणी आॅनलाईन खरेदी टाळावीच.