विद्युत रोहित्र जळाल्याने रबी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:06+5:302021-03-19T04:28:06+5:30
वीज वितरण विभागाने या ठिकाणी दुसरे ट्रान्सफाॅर्मर लावले; परंतु ते ट्रान्सफाॅर्मर १२ तासच चालते. त्यामध्ये बिघाड आले. त्यामुळे वीज ...

विद्युत रोहित्र जळाल्याने रबी पिकांचे नुकसान
वीज वितरण विभागाने या ठिकाणी दुसरे ट्रान्सफाॅर्मर लावले; परंतु ते ट्रान्सफाॅर्मर १२ तासच चालते. त्यामध्ये बिघाड आले. त्यामुळे वीज वितरण विभागाने नवीन ट्रान्सफाॅर्मर आणून लावले; पण तो ही ट्रान्सफाॅर्मर फक्त २४ तास चालून बंद पडले. त्यामुळे वीज वितरण विभागाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. कोसमतोंडी परिसरातील बोळुंदा शेतशिवारात कोसमतोंडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांनी या शेतशिवारात उन्हाळी धानाची लागवड केली आहे. वीज कनेक्शन असणाऱ्या शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणासुद्धा केला; पण वीज वितरण विभागाचे हलगर्जीपणामुळे लाइन वेळेवर राहत नाही. त्यामुळे उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. त्यातच मागील आठ दिवसापासून विद्युत ट्रान्सफाॅर्मर जळाल्याने वीज वितरण विभागाने दोनदा दुसरे ट्रान्सफाॅर्मर बसविले; पण ते ही ट्रान्सफाॅर्मर एक १२ तास व दुसरे २४ तास सुरू राहून बंद पडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक सुकलेले आहे. मागील आठ दिवसांपासून विजेचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक करपत आहे. याला जबाबदार वीज वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आहेत.
वीज वितरण विभाग शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करीत नसून आठ दिवसांपासून बंद पडलेल्या ट्रान्सफाॅर्मरच्या जागी नवीन ट्रान्सफाॅर्मर न लावता नादुरुस्त व जुने ट्रान्सफाॅर्मर लावून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पिकाचे नुकसान होत आहे आणि हाती आलेले धान पीक नष्ट होत आहे. पूर्वीच शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला असून वीज वितरण विभागाचे भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा होत नसल्याने धान व इतर पिकांचे नुकसान होत आहे. वीज बिलाचा भरणा भरणा वेळेवर भरूनसुद्धा शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करण्यात येत नाही. त्यामुळे वीज वितरण विभागाचे भोंगळ कारभारावर शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.