The crowds in the ST buses have increased due to price rise | भाऊबिजेमुळे वाढली एसटी बसेसमधील गर्दी
भाऊबिजेमुळे वाढली एसटी बसेसमधील गर्दी

ठळक मुद्देआगाराचे उत्पन्न वाढणार : बस फेऱ्यांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवाळी आणि पाडव्यानंतर सासुरवासीण बहिणींना माहेरची ओढ लागते.भाऊबिजेपासून मोठ्या प्रमाणात बहिणी माहेरी जातात. त्यामुळे एसटी स्थानकावर प्रवाशांची अलोट गर्दी होत आहे. येथील एसटी स्थानकात बहिणींची माहेरी जाण्यासाठी तर भाऊरायांची बहिणींना आणण्यासाठी एकच लगबग सध्या बघायला मिळत आहे.
रविवारी दीपावलीनंतर अनेक बहिणींनी मंगळवारी सासरी पाडवा साजरा केला. त्यानंतर सोमवारपासूनच बहिणींची माहेरी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. मंगळवारी भाऊबीज असल्याने, सकाळपासूनच बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे, ज्यांना भाऊबिजेला जाणे जमले नाही त्या दुसऱ्या दिवशी माहेरी निघाल्या. त्यामुळे स्थानकासह ऑटो स्टॅन्डवरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत. यामध्ये बहिणी माहेरी जाण्यासाठी तर भाऊ आणि घरातील ज्येष्ठ मंडळींना आणण्यासाठी निघाले आहे. बस स्थानकावर प्रवाशांच्या तुलनेत बसेसच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेकांची वाताहत होत आहे. तर काही जण खासणी वाहनाने माहेर तसेच सासूरवाडीला जात आहे.

शिवशाहीही हाऊसफुल्ल
पाडवा आणि भाऊबीजनिमित्त एसटी बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे.मात्र नियोजनात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवशाही बसेसलाही सध्या चांगले दिवस आले असून प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. दिवाळीत प्रवाशी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. महामंडळाला उत्पन्न मिळून देणाऱ्या या सणानिमित्ताने दरवर्षी नियोजने नियोजन केले जाते. त्यानुसार लांबपल्ल्याच्या बसेस सोडण्यात येतात. यंदा महामंडळाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शिवशाही बसेस सुरू केल्या आहे. नागपूर, अमरावती, पूणे आदी मार्गावर शिवशाही बसेस धावत आहेत. परंतु दिवाळीनिमित्त सद्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशातच बसेसला ऑनलाईन बुकींग असल्यामुळे वेळेवर येणाऱ्या प्रवाशांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

वेळापत्रक ढासळले
दिवाळीत बसेसला होणारी गर्दी लक्षात घेता. महामंडळाने नियोजन केले आहे. मात्र वेळेवर बस जात नसल्याने अनेकांना ताटकळत बसावे लागत आहे. बसमध्येही जागा मिळणे कठीण झाले आहे.

Web Title: The crowds in the ST buses have increased due to price rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.