शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

शहरातील गोरेलाल चौक व दुर्गा चौकात सराफा लाईन आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीला सोने चांदीची मागणी लक्षात घेऊन सराफा व्यावसायिकांनी विविध दागिने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते. दिवाळी दरम्यान सोने आणि चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी मागणी असते. त्यातच धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.

ठळक मुद्देलाखो रुपयांची उलाढाल : सराफा बाजारात उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.त्यामुळे शुक्रवारी (दि.२५) सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शहरातील सराफा दुकानात मोठी गर्दी केली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी लाधो रुपयांच्या सोने आणि चांदीची विक्री झाल्याचे सराफ व्यावसायिक देखील सुखावल्याचे चित्र होते.शहरातील गोरेलाल चौक व दुर्गा चौकात सराफा लाईन आहे. शुक्रवारी धनत्रयोदशीला सोने चांदीची मागणी लक्षात घेऊन सराफा व्यावसायिकांनी विविध दागिने विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले होते. दिवाळी दरम्यान सोने आणि चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी मागणी असते. त्यातच धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे वर्षभर केलेल्या बचतीतून सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक आग्रही असते. शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासूनच सराफा लाईनमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत होतीे. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ग्राहकांच्या गर्दीत वाढ झाली होती. सराफा व्यावसायीकांनी दिलेल्या माहितीनुसार धनत्रयोदशीला दिवसभरात ५ ते ६ कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली. दरम्यान धनत्रयोदशीमुळे बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलल्याने व्यापारांमध्ये सुध्दा समाधानाचे वातावरण होते. बाजारपेठेतील सर्वच दुकांनामध्ये शुक्रवारी गर्दी दिसून आली.बाजारपेठ गर्दी फुललीदिवाळी निमित्त विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मागील दोन दिवसांपासून बाजारपेठेत शुकशुकाट होता.धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांनी सोने, कपडे तसेच इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत आले होते. ग्राहकांच्या गर्दीमुळे गोरेलाल चौक परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.

टॅग्स :Goldसोनं