शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिसऱ्या दिवशी मिठाची खरेदी करण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

येत्या काही दिवसात मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा देवरी तालुक्यात फसरली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी गुरूवारी (दि.१४) देवरी येथील किराणा दुकानांमध्ये मिठाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ठळक मुद्देकिराणा दुकानात मिठाचा तुटवडा : ग्रामीण भागात मीठ टंचाईची अफवा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : संपूर्ण लॉकडाऊनमुळे गुजरात व मुंबईमध्ये मीठ तयार करणारे मजूर आपआपल्या गावाकडे परतत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा देवरी तालुक्यात फसरली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी गुरूवारी (दि.१४) देवरी येथील किराणा दुकानांमध्ये मिठाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.मिठाची टंचाई निर्माण होणार असल्याच्या चर्चेमुळे देवरी तालुक्यात २५ किलो वजनाची मिठाची पोती पूर्वी १५० ते १६० रूपयात विकली जात होती. आता तीच पोती २०० ते २५० रूपये दराने विक्री केली जात आहे. देवरी तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यात दोन-तीन दिवसांपूर्वी व्हॉटसअ‍ॅपवर गुजरात व मुंबईमध्ये मीठ तयार करणारे मजूर आपआपल्या गावी गेल्याने येत्या काही दिवसात बाजारपेठेत मिठाचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा पसरविण्यात आली. छत्तीसगड राज्यातील लोकांनी देवरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फोन करून तातडीने मीठ खरेदी करून ठेवण्याचा सल्ला दिला. या संदेशानंतर देवरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाºया लोकांनी शहरातील सर्व किराणा दुकानातून मिठाची खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. तर काही दुकानदारांनी या संधीचा फायदा घेत दुप्पट दराने मिठाची विक्री केल्याची माहिती आहे. दहा रुपयांना मिळणाऱ्या मिठाच्या पॉकिटाची विक्री दुकानांमध्ये चक्क ३० रुपयांंना केली जात आहे. दरम्यान मिठाच्या टंचाईच्या अफवेमुळे किराणा दुकानादारांनी आपली चांगलीच चांदी करुन घेतली. मात्र या प्रकाराकडे तालुका प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे ग्राहकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. दरम्यान या प्रकाराची काही नागरिकांनी देवरी येथील तहसीदारांकडे तक्रार केली आहे.मिठाचा तुटवडा ही अफवाज्या ठिकाणी मीठ तयार होते. तेथील मजूर लोक संचारबंदीमुळे आपआपल्या गावाकडे गेल्याने मिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा लगतच्या छत्तीसगड राज्यातून पसरविण्यात आली. या अफवेमुळे अनेक ग्राहकांनी नेहमीपेक्षा जास्तीचे मिठाची खरेदी करुन ठेवली. काही व्यापाऱ्यांनी जर जास्ती दराने मिठाची विक्री केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. मिठाचा तुडवडा नसून सगळीकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे.-सोनू अग्रवाल, व्यापारी देवरी

टॅग्स :Socialसामाजिक