मी जे बोलतेय ते परफेक्ट ठिकाणी जात असल्यामुळे माझ्यावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 21:30 IST2022-12-02T21:29:18+5:302022-12-02T21:30:04+5:30

Gondia News सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना फुटणार या मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

Criticize me because what I am saying goes to the perfect place | मी जे बोलतेय ते परफेक्ट ठिकाणी जात असल्यामुळे माझ्यावर टीका

मी जे बोलतेय ते परफेक्ट ठिकाणी जात असल्यामुळे माझ्यावर टीका

ठळक मुद्दे शिवसेना वाढणार असल्याने त्यांना भीती

गोंदिया : सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना फुटणार या मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. प्रकाश महाजनांनी पेढे वाटावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

सुषमा अंधारेमुळे शिवसेना वाढणार आहे याची भीती त्यांना असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले. मी जे बोलतोय ते परफेक्ट ठिकाणी जात असल्यामुळे माझ्यावर टीका होत असल्याचे शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेतर्फे शुक्रवारी (दि.२) गोंदिया येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करण्यासाठी सुषमा अंधारे या गोंदियाला आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महिला मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय क्रांतिकारक असल्याचे वक्तव्य अंधारे यांनी केले.

मी मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आहे असे वक्तव्य करणे केवळ कंड्या पिकवण्याचे काम असल्याचे त्या म्हणाल्या. मी माझा भाऊ नरेंद्र भोंडेकर यांच्या भेटीला आली अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी भोंडेकरांवर पलटवार करताना दिली.

शिवसेना थकलेली नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेबद्दल विचारले असता आम्ही सुद्धा आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी आलेलो आहे. शिवसेना थकलेली नाही, नव्या उमेदीने लढणार हे दाखविण्यासाठी मी आलेली आहे असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. चार दोन आमदार हलले म्हणजे शिवसेना संपली असे होत नाही. शिवसेनेचे मुख्य बेस हे त्यांचे मतदार आहे ते अजूनही शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले आहे. त्यांना नवीन ताकद आणि उमेद देण्याकरिता आल्याचे सांगितले.

Web Title: Criticize me because what I am saying goes to the perfect place