धान कापणी यंत्रामुळे मजुरांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:43+5:302021-01-13T05:15:43+5:30
........ ग्रामीण भागात माकडांचा आतंक वडेगाव : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहेत. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी ...

धान कापणी यंत्रामुळे मजुरांवर संकट
........
ग्रामीण भागात माकडांचा आतंक
वडेगाव : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहेत. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. माकडे घरांवरील केवलू व भाजीपाल्यांचे नुकसान करीत आहेत.
धानपिकाचे नुकसान
बाम्हणी-खडकी : येथील धानपीक असलेल्या क्षेत्रालगत राखीव व्याघ्र प्रकल्प आहे. शेतकऱ्यांचे धानपीक पूर्णत: भरले असून कापणीच्या मार्गावर आहे. मात्र, या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याचे धानपिकाचे नुकसान होत आहे.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकलगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधीसुद्धा पसरू शकते. परिणामी येथून ये-जा करणाऱ्यांना नाक दाबून जावे लागते.
रुग्णांना मोफत औषधोपचार
बोंडगावदेवी : मानसिक रोगग्रस्तांना औषधोपचार मिळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे मानसिक आजारावर मात करता येते.
नाल्यांअभावी पाणी वाहते रस्त्यांवरून
गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाहीत. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या. त्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देऊनही नागरिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
जिल्ह्यात कृषिपंप चोरटे सक्रिय
बोंडगावदेवी : सिंचनासाठी विहीर, नदीनाल्यावर लावलेले कृषिपंप चोरीस जाण्याच्या घटनात जिल्ह्यात वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडत असून एखादी टोळी जिल्ह्यात सक्रिय असावी, अशी शंका निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेल्यानंतर तक्रार नोंदविण्यासाठी नानाविध प्रश्न केले जातात म्हणून तक्रार देण्यास शेतकरी उदासीन दिसून येतात.
हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त
गोंदिया : शहराच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन होत असून त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत आहे. ही वाहने भरधाव वेगात धावत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. शिवाय कर्णकर्कश हॉर्नमुळे प्रदूषण वाढत आहे.
गौण खनिज चोरीकडे दुर्लक्ष
गोंदिया : महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतील गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे, परंतु महसूल विभाग केवळ रेती तस्करांच्या मागावर असतात. त्यामुळे मुरूम, दगड चोरट्यांना रान मोकळे असते. महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतून हजारो ब्रास गौण खनिज चोरीस जात आहे. याकडे महसूलचे दुर्लक्ष आहे.