मोबाईलसह रोख रक्कम पळवणारा निघाला सराईत गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:35 IST2021-08-18T04:35:23+5:302021-08-18T04:35:23+5:30
गोंदिया : शहरातील भीमनगर परिसरातील मैत्री बुध्द विहाराजवळील वैष्णव अनिल भरणे (२३) या तरुणाचा मोबाईल व उशीखाली ठेवलेले १० ...

मोबाईलसह रोख रक्कम पळवणारा निघाला सराईत गुन्हेगार
गोंदिया : शहरातील भीमनगर परिसरातील मैत्री बुध्द विहाराजवळील वैष्णव अनिल भरणे (२३) या तरुणाचा मोबाईल व उशीखाली ठेवलेले १० हजार रुपये रोख असा २३ हजारांचा माल १३ ऑगस्टरोजी पहाटे पळविण्यात आला होता. या प्रकरणात शहर पोलिसांनी रितिक राजू डहाट (वय २१) याला अटक केली. त्याला १६ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्याची रवानगी भंडारा येथील तुरुंगात करण्यात आली आहे. तो आरोपी सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर ४ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी दोन गुन्हे घरफोडीचे, एक गुन्हा चोरीचा, तर एक गुन्हा मारामारीचा आहे. त्याला अटक करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, नायक पोलीस शिपाई दीपक रहांगडाले, सुबोध बिसेन, योगेश बिसेन, छगन विठ्ठले, विकास वेदक, जागेश्वर उईके, सतीश शेंडे, प्रोद चव्हाण यांनी केली आहे.