घराघरात कार्यकर्ते तयार करा
By Admin | Updated: December 23, 2014 23:07 IST2014-12-23T23:07:21+5:302014-12-23T23:07:21+5:30
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीयतेची विचारधारा जनमानसांत रुजलेली आहे. पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या सदस्यता मोहीमेत कार्यकर्त्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून घराघरांत

घराघरात कार्यकर्ते तयार करा
राजकुमार बडोले : भाजपच्या जिल्हा बैठकीत आमदारांचा सत्कार
आमगाव : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीयतेची विचारधारा जनमानसांत रुजलेली आहे. पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या सदस्यता मोहीमेत कार्यकर्त्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून घराघरांत पक्षाचा कार्यकर्ता तयार करावा व त्याला देशाच्या परिवर्तनात सहभागी करून घ्यावे. देशात परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्षाला सशक्त करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते आमगाव येथील लक्ष्मणराव मानकर फॉर्मसी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी २१ डिसेंबर रोजी आयोजित भाजपच्या जिल्हा विस्तारीत बैठकीत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. यावेळी प्रामुख्याने आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आ. केशव मानकर, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. खुशाल बोपचे, माजी आ. भेरसिंह नागपुरे, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा संघटनमंत्री आशिष वांदिले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रचना गहाणे, जेष्ठ कार्यकर्ते गोविंदराव पुंड, जि.प. सभापती कुसन घासले, सविता पुराम, मोरेश्वर कटरे, महिला मोर्चा अध्यक्ष सीता रहांगडाले, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, दीपक कदम, सुभाष आकरे आदी उपस्थित होते.
ना. राजकुमार बडोले, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले यांचा जिल्हा भाजपतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी आ. हेमंत पटले यांचा विधानसभेतील संसदीय योगदानाबद्दल राज्य शासनातर्फे गौरव करण्यासाठी निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सभेत मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष अग्रवाल म्हणाले, २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशात राष्ट्रीय सुशासन दिवस पाळला जाणार आहे. या दिनानिमत्त प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बुथ व परिसरात स्वच्छता मोहीम व इतर उपक्रम राबवायचे असून सदस्यता मोहीम बुथ व वॉर्डात राबवायची आहे.
याप्रसंगी आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. हेमंत पटले, सुभाष आकरे, सीता रहांगडाले, जयंत शुक्ला यांनीही आपले मत मांडले.
सभेचे संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. सभेचे संचालन अहमद मनियार, नंदकुमार बिसेन, रघुनाथ लांजेवार, शामलाल शिवणकर, येसुलाल उपराडे, बाबा लिल्हारे, छत्रपाल तुरकर, गजानन डोंगरवार, भाऊराव उके, श्रावण राणा, प्रदीपसिंग ठाकुर, मिनू बडगुजर, प्रवीन दहिकर, सविता इसरका, रुपाली टेंभुर्णे, चित्रलेखा चौधरी, योगेश्वरी पटल व अन्य उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)