शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांच्या विक्रीत यावर्षी घट !

By admin | Updated: October 18, 2014 23:28 IST

दिवाळी हा सण भारतवासीयांचा सर्वाधिक महत्त्वाचा सण समजला जातो. दिवाळीपूर्वी नागरिक आपापल्या घरांची स्वच्छता व रंगरंगोटी करून उत्सव साजरा करतात. तेलाच्या दिव्यांपासून रोषणाई व

गोंदिया : दिवाळी हा सण भारतवासीयांचा सर्वाधिक महत्त्वाचा सण समजला जातो. दिवाळीपूर्वी नागरिक आपापल्या घरांची स्वच्छता व रंगरंगोटी करून उत्सव साजरा करतात. तेलाच्या दिव्यांपासून रोषणाई व आकाशदिवेही लावले जातात. परंतु फटाके फोडल्याशिवाय दिवाळीचा आनंदोत्सव साजराच होत नाही, अशी धारणा लोकांमध्ये रुढ झाली आहे. असे असले तरी यावर्षी फटाक्यांना काही प्रमाणात आवर घातल्या गेला आहे. फटाक्यांच्या वाढलेल्या किमती आणि प्रदूषण अशा दोन्ही बाबी त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.याबाबत ‘लोकमत’ने कानोसा घेतला असता दिवाळी साजरी करताना सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच प्रमाणात महागाईची झळ सहन करावी लागल्याचे दिसून आले. यातूनच फटाक्यांची विक्री दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे फटाके व्यावसायिकांनी सांगितले.यावर्षी जिल्ह्यात आधी पावसाच्या थैमानाने अनेकांची घरे, गोठे धराशायी झाले. धानपीक तर पाण्यात बुडाले. काही पीक अतिवृष्टीच्या पावसात वाहून गेले. उर्वरित पिकांवर रोगांनी हल्ला चढविला. यंदा दरवर्षीच्या तुलनेत पिकांचे उत्पन्न कमी आहे. त्यातच शासकीय धान खरेदी सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे दिवाळीसारखा सण यंदा नागरिकांना उत्साहाने साजरा करता आला नाही. याचा परिणाम फटाके व्यायसायिकांवर होवून फटाक्यांची विक्री कमी झाल्याचे गोंदियातील फटाका व्यावसायिक बेनिमाधव चौरसिया व संजय चौरसिया यांनी सांगितले. शहरात सहा ते सात फटाके विक्रीचे ठोक व्यावसायिक आहे. याशिवाय जवळपास १०० किरकोळ विक्रेते आहेत. यंदा नागरिकांनी कमी आवाजाच्या व स्वस्त दराच्या फटाक्यांना पसंती दर्शवून ते खरेदी केले. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान न होता ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्याची नागरिकांची भावना दृढ होत असल्याचे दिसून आले. अनार, फुलझडी, चक्री, लुझबॉम्ब, टिकल्या, आगपेटी, फॅन्सी फटाके आदी अत्यंत कमी आवाजाचे फटाके यंदा अधिक प्रमाणात विक्री झाले. याशिवाय बाजारात सुतळी बाँब, लक्ष्मी बाँब, रॅकेट, एकापाठोपाठ सात ते ३० आवाज होणारे फटाके उपलब्ध होते. मात्र ते कमी प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.