वाढत्या अपघातांवर विभागाचे पांघरूण

By Admin | Updated: May 13, 2014 23:38 IST2014-05-13T23:38:54+5:302014-05-13T23:38:54+5:30

जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. वाहतूक व परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक फोफावली आहे. या अवैध वाहतुकीमुळे मात्र नागरिकांवरच मृत्यूची घंटा वाजत आहे.

Covering the section on increasing accidents | वाढत्या अपघातांवर विभागाचे पांघरूण

वाढत्या अपघातांवर विभागाचे पांघरूण

 यशवंत मानकर - आमगाव

जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. वाहतूक व परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक फोफावली आहे. या अवैध वाहतुकीमुळे मात्र नागरिकांवरच मृत्यूची घंटा वाजत आहे.

अवैध वाहतुकीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक मार्ग धोक्याची घंटा वाजवत आहे. जड वाहनांपासून तर काळीपिवळी टॅक्सी वाहने प्रवाशांना भूलथापा देत वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाच्या मेहरनजरेने अवैध वाहतूकीला गती देत आहेत. जड वाहनांची संख्या दिवसेंदिवस मार्गावर वाढत आहेत. या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त भार लादून मोठय़ा प्रमाणात उलाढाल सुरू आहे. परंतु वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग याकडे लक्ष केंद्रीत करीत नसल्याचे निदर्शनात येते. रस्त्यावर धावणार्‍या जड वाहनांच्या नियमांचे पालन होत नाही. अनेक वाहनांवर नोंदणी क्रमांक नाही. वाहनांच्या मागेपुढे दिशा दर्शक दिव्यांची शोधाशोध नाही. त्यामुळे हे जड वाहन रस्त्यांवर नियमांची पायमल्ली करीत धावत आहेत. दुसरीकडे प्रवासी वाहतूक करणार्‍या काळी-पिवळी टॅक्सी नियमापेक्षा अधिक प्रवासी भरुन वाहतूक अधिकार्‍यांच्या डोळ्यासमोर पुढची मजल मारीत आहेत. या वाहनांची परिस्थिती भंगारापेक्षा बिकट झाली आहे. परंतु ही वाहने सर्रासपणे रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करीत आहेत.

रस्त्यांवर वाढते जड वाहन व प्रवासी काळी-पिवळी अवैध प्रवासी वाहतुकीमुळे नागरिकांना रस्त्यांवर पायदळ चालणे कठीण झाले आहे. जड वाहने व अवैध प्रवासी वाहने नियमांना बगल देत वाहनांवरील दुरुस्ती टाळत धोक्यात धावत आहेत. तर जड व प्रवासी वाहतूक वेगाने रस्त्यांवर धावत नागरिकांचा बळी घेत आहेत. या वाहनांमुळे मार्गांंवरील अपघातात वाढ झाली आहे. अनेक नागरिकांचा या अपघातांमध्ये नाहक बळी गेला आहे. परंतु या घटनांकडे वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष केंद्रित केले नाही. त्यामुळे नियमांची पायमल्ली करीत वाहतूक सुरूच आहे. मार्गावर काळी-पिवळी प्रवासी वाहतूक तर अनधिकृत ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या दिशादर्शक दिव्यांचा शोधच लागत नाही. त्यामुळे वाहनांच्या अपघातात वाढ झाली आहे.

वाहतूक व प्रादेशिक परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध प्रवासी व जड वाहतुकीवर ब्रेक लागणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांवर मृत्यूची घंटा सतत वाजत आहे.

Web Title: Covering the section on increasing accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.