‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करण्याची माणणी

By Admin | Updated: December 29, 2014 23:46 IST2014-12-29T23:46:26+5:302014-12-29T23:46:26+5:30

क्रीडा संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल व सेमी फायनल चमू न ठरविता सर्व शिक्षक एका खोलीत बसून कुणाला क्रमांक द्यायचे या विचारत पडले होते. तसेच बक्षीस वितरण

The court ordered to take action against those teachers | ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करण्याची माणणी

‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करण्याची माणणी

गोंदिया : क्रीडा संमेलनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल व सेमी फायनल चमू न ठरविता सर्व शिक्षक एका खोलीत बसून कुणाला क्रमांक द्यायचे या विचारत पडले होते. तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमात न येता शिक्षकांनी आलेल्या मान्यवरांना वाट पहायला लावून स्वदेशी क्रीडा मंडळाला तमाचा मारला, असा आरोप करून त्यात दोषी असणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी रतन वासनिक यांनी केली आहे.
स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जि.प. गोंदिया अंतर्गत आसोली केंद्र क्रीडा संमेलन जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरवाही (पं.स. गोंदिया) येथे २१ ते २४ डिसेंबर २०१४ पर्यंत आयोजित करण्यात आले होते. यात १३ ग्रामपंचायतींचे सर्वच पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. आपापल्या शाळांना व विद्यार्थ्यांना क्रमांक मिळेल अशी आशा पल्लवित करू पाहत होते. तसेच आपआपसात आपापल्या गावच्या शाळांच्या विजयाची बाजी लावून घोषणाबाजी करीत होते.
मात्र २१ डिसेंबरला उद्घाटन समारंभ पार पडून क्रीडोत्सवाला सुरूवात झाली व शिक्षकांनी आपआपसात संगनमत करून हा उत्सव निधनोत्सव कसा ठरेल, याची व्युहरचना केल्याच्या आरोप रतन वासनिक यांनी केला आहे. याचे कारण म्हणजे या उत्सवाची सांगता २४ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभाने होणार होती. ठरल्यानुसार सर्व पाहुणे मंडळी संमेलनाच्या मंडपात पोहचले होते. परंतु त्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी एकही शिक्षक उपस्थित नव्हता. तेव्हा गावकऱ्यांनी सांगितले की, शिक्षकवृंद शाळेच्या खोलीत बसून कोणत्या शाळेच्या खो-खो व कबड्डी चमूला अंतिम विजयी करून प्रथम व द्वितीय पुरस्कार द्यावे, याबाबत चर्चा करण्यात रंगले होते. ही बाब समजल्यावर पंचायत समिती सदस्य रामू चुटे यांनी केंद्रप्रमुख वैद्य यांना फोन केल्यावर ते बाहेर आले व विनंती करू लागले की आपआपसात सर्व शिक्षकांनी चर्चा केली व त्यानुसार बक्षीस वितरण करा. यावर गावकरी, सर्व पदाधिकारी, नेते व पाहुणे बावरले. शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी बरईकर यांच्याशी फोनवर संपर्क करून घटनेचे गांभीर्य सांगितले व सर्वच दोषी शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करावे, अशी मागणी केली.
विशेष म्हणजे सदर क्रीडा संमेलन पार पाडण्यासाठी पंचायत समिती गोंदियाचे गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रान्वये प्राप्त सूचनांचे सर्वच शाळांनी पालन करावे, असे स्पष्ट आदेश आहे. तरीसुद्धा जि.प. च्या शिक्षकांनी असे का केले, हे कळण्यापलीकडे आहे. त्या दिवसापर्यंत सेमी फायनल व फायनल शेवटच्या तारखेपर्यंत न ठरविल्याने व बक्षीस वितरण समारंभाची सुरूवात न करून स्वदेशी क्रीडा मंडळाला तमाचा मारला.
यात दोषी असलेल्या सर्व शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी १३ गावांचे सरपंच, बक्षीस वितरणासाठी आलेले पाहुणे, जि.प. सदस्य रामू चुटे, पं.स. सदस्य सुरेश कावळे, सरपंच रवी हेमने, मेंढे, इतर गावातील सरपंच व गणमान्य नागरिकांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The court ordered to take action against those teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.