Coronavirus : मास्क लावूनच पार पडला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 06:47 AM2020-03-20T06:47:26+5:302020-03-20T06:48:01+5:30

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यापूर्वी मुहूर्त निश्चीत होऊन निमंत्रण पत्रिका घरोघरी पोहोचल्या होत्या. बऱ्याच गोष्टींवर खर्च झाल्यानंतर कोरोनामुळे सोहळ्यावर टाच आल्याने आता कसे करायचे

Coronavirus: The marriage that was accomplished by wearing a mask | Coronavirus : मास्क लावूनच पार पडला विवाह

Coronavirus : मास्क लावूनच पार पडला विवाह

Next

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दाभना (अरततोंडी) येथे ग्रामपंचायत व पंचायत समितीच्यावतीने वर-वधू व वºहाड्यांना मास्क लावून विवाह सोहळा पार पाडला. मास्क लावूनच सर्वांनी मुर्हुतावर अक्षता टाकल्या.
दाभना येथील देवीदास प्रधान यांची कन्या अश्विनी व पारडी मुर्झा (लाखांदूर) येथील गुलाब किरसान यांचे चिरंजीव शरद यांचा विवाह सोहळा गुरुवारी होता.
राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यापूर्वी मुहूर्त निश्चीत होऊन निमंत्रण पत्रिका घरोघरी पोहोचल्या होत्या. बऱ्याच गोष्टींवर खर्च झाल्यानंतर कोरोनामुळे सोहळ्यावर टाच आल्याने आता कसे करायचे, असा प्रश्न वधु-वर मंडळींपुढे होता. परंतु दाभना ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. दीपक रहिले यांनी खबरदारी घेत सोहळा पार पाडला.
मंडपाच्या बाहेर आयोजकांच्या आडनावाचे स्वागत फलक असते त्या ठिकाणी कोरोना विषाणूंच्या आजारात घ्यावयाची काळजीचे मोठे फलक लावण्यात आले.
 

Web Title: Coronavirus: The marriage that was accomplished by wearing a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.