जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:31+5:30

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत १५ हजार ८१८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १३६७ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १४ हजार १२२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. १७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. ४५९ नमुन्यांचा अहवाल अद्यापही अनिश्चित आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे.

Corona's havoc in the district continues | जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम

जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम

ठळक मुद्दे५६ नवीन बाधितांची भर : ७४ रुग्णांची कोरोनावर मात : कोरोना बाधितांची संख्या १३६७ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग दुप्पट झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. शनिवारी (दि.२९) आणखी ५६ कोरोना बाधितांची भर पडली त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा १३६७ वर पोहचला आहे. तर ७५ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ८७५ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या एकूण ५६ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ३६ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे. गोंदिया शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये गोंदिया शहरातील रिंग रोड (मनोहर वार्ड) एक रुग्ण, गंजवार्ड -एक रुग्ण, सावराटोली येथील सात रुग्ण, कामठा येथील एक रुग्ण, दासगाव येथील एक रुग्ण, आरटीओ ऑफिसच्या मागे एक रुग्ण, पंचायत समिती कॉलनी एक रु ग्ण, रेलटोली येथील एक रुग्ण, आयटीआयच्यामागे एक रुग्ण, गणेशनगर येथे एक रुग्ण, छोटा गोंदिया येथे एक रूग्ण, यादव चौक येथे तीन रुग्ण, फुलचूर येथे एक रुग्ण, वसंतनगर येथे एक रुग्ण, रामनगर येथे दोन रुग्ण, डांगोर्ली येथे दोन रुग्ण, चारगाव येथे सहा रुग्ण, रापेवाडा व श्रीनगर येथे प्रत्येकी एक रु ग्ण आहे. तिरोडा तालुक्यात बारा रुग्ण आढळले असून शहरातील दहा रुग्ण हे सुभाष वार्ड व एक रुग्ण हा रविदास वार्ड आणि एक रुग्ण मुरमाडी येथील आहे.गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील रुग्ण, आमगाव तालुक्यातील ठाणा येथील एक रुग्ण, बनगाव वॉर्ड क्रमांक ३ येथील दोन रु ग्ण, सालेकसा येथील एक रुग्ण, सडक-अर्जुनी येथील एक रुग्ण आणि अर्जुनी मोरगाव येथील दोन रुग्ण अशा एकूण ५६ रु ग्णांचा समावेश आहे.

१४ हजार १२२ नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत १५ हजार ८१८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १३६७ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १४ हजार १२२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे. १७४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. ४५९ नमुन्यांचा अहवाल अद्यापही अनिश्चित आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे.या चाचणीतून आतापर्यंत १०३६६ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये १००५९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.३१७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मागील पाच महिन्यात कोरोनाने सहा जणांचा मृत्यू झाला. तर ऑगस्ट महिन्यात कोरोनाने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३६७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आॅगस्ट महिना जिल्हावासीयांसाठी चिंताजनक ठरला.

Web Title: Corona's havoc in the district continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.