कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:34+5:30
जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळेच सातत्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने आतापर्यंत एकूण २१३ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के असून मृत्यू दर १.२५ टक्के आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत २१३ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळेच सातत्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने आतापर्यंत एकूण २१३ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची अँटिजेन रॅपिड टेस्ट केली जात आहे.
बाहेरुन येणाºया रुग्णांना क्वारंटाईन केले जात असल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. रुग्णांवर त्वरित उपचार करणे, कंटेन्मेंट झोनमध्ये एक्टीव्ह सर्वे करुन आजाराची कोणत्याही प्रकारची लक्षणे असलेल्या नागरिकांची व ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींची देखरेख, फिव्हर क्लीनिकमध्ये येणाऱ्या नागरिकांचा पाठपुरावा यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८९.५ टक्के आहे. यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल असून २३६ पैकी २१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.