कोरोना योद्धांचा केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:22 IST2021-06-01T04:22:04+5:302021-06-01T04:22:04+5:30

गोंदिया : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील ...

Corona warriors felicitated | कोरोना योद्धांचा केला सत्कार

कोरोना योद्धांचा केला सत्कार

गोंदिया : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ७ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील फ्रंटलाऊन वर्कर्सचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन तेथील कोरोना योद्धांचा सत्कार केला.

ग्राम खमारी व चुलोद

गोंदिया : भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना कदम यांनी ग्राम चुलोद व दतोरा येथे जाऊन तेथील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा वर्करचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. या अंतर्गत, ग्राम चुलोद लायेथे सरपंच बालू बिसेन, माजी सरपंच बाबा ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य मोहन बरईकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य सेवक जगदीश उके, सेविका व आशा वर्कर सुरेखा कटरे, प्रतिभा भालाधरे, सावित्री पिसोडे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. तर ग्राम दतोरा येथे आरोग्य सेवक व सेविका एल.पी.तूरकर, यू. के. बिसेन, भूमेश्वरी चित्रीव, नंदा गायधने, आशा महारवाडे व जगदीश उके यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Corona warriors felicitated