शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

कोरोना रूग्ण वाढीला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM

विदेशातून येणाऱ्यांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा २१० वर पोहचला. आतापर्यंत ३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत १५९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे.

ठळक मुद्दे१० कोरोना बाधित झाले कोरोनामुक्त : ५२२२ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील १२ दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा व्दिशतक पार झाला आहे. रूग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतो काय अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र रविवारी (दि.१२) प्रथम नवीन कोरोना बाधित रूग्णाची नोंद झाली नाही. तर १० कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना गेल्या १२ दिवसांत प्रथमच दिलासा मिळाला आहे.विदेशातून येणाऱ्यांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा २१० वर पोहचला. आतापर्यंत ३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने आतापर्यंत १५९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. त्यामुळे सध्या केवळ ४७ कोरोना बाधितांवर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ५६६३ स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २१० स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर ५२२२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. १६६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेडून प्राप्त व्हायचा असून ६३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहेत. रविवारी कोरोनामुक्त झालेल्यांना येथील कोविड केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. यावेळी येथील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनामुक्त झालेल्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच टाळ्या वाजवून निरोप दिला.१४१८ जण क्वारंटाईनकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाºया व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ठेवले जाते. सध्या ४०४ जण संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात तर १०१४ जणांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले असून या सर्वांवर आरोग्य विभागाची नजर आहे.जिल्ह्यात आता १९ कंटेन्मेंट झोनकोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्याला प्रतिबंध लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत केला जात आहे. जिल्ह्यात सध्या एकूण १९ कंटेन्मेंट झोन आहेत. यात, गोंदिया तालुक्यातील ग्राम मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, सेजगाव, पारडीबांध, शहरातील कुंभारेनगर परिसर, सालेकसा तालुक्यातील ग्राम पाऊलदौना, पाथरी, शारदानगर, तिरोडा तालुक्यातील तिरोडा शहरातील सुभाष वॉर्ड, बेरडीपार, बेलाटी खुर्द, वीर सावरकर वॉर्ड, भुतनाथ वॉर्ड आणि गराडा, गोरेगाव तालुक्यातील ग्राम भडंगा, सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम राका, सौंदड व खोडशिवणीचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या