शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

ग्रामीण भागात तयार होत आहेत कोरोनाचे हाटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसाच्या अंतरात तब्बल ३४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमधून रेडझोनमध्ये परार्वतीत झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्व कोरोना बाधीत रुग्ण हे मुंबई, पुणे या रेडझोन मधून आलेले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शासनाने विविध जिल्ह्यात आणि राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्यास परवानगी दिली.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण । प्रशासनाची उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंबई येथे रोजगारासाठी गेलेले अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ६७ मजूर स्वगृही परतले. यापैकी २५ मजूर कोरोना बाधित आढळले. तर उर्वरित मजुरांचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. सडक अर्जुनी, आमगाव, गोरेगाव, सालेकसा, गोंदिया, तिरोडा या सात तालुक्यात सुध्दा कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहे. ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने याच भागात आता कोरोनाचे हाटस्पॉट तयार होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसाच्या अंतरात तब्बल ३४ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमधून रेडझोनमध्ये परार्वतीत झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले सर्व कोरोना बाधीत रुग्ण हे मुंबई, पुणे या रेडझोन मधून आलेले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शासनाने विविध जिल्ह्यात आणि राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही जाण्यास परवानगी दिली. या कालावधीत जिल्ह्यात बाहेरील जिल्हा आणि राज्यातून ७ हजार ५४६ नागरिक परत आले आहे. रोजगारासाठी मोठ्या शहरात व राज्यांमध्ये गेलेले नागरिक मागील दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात परतत आहे. यामुळे कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात जे एकूण ३९ रुग्ण आढळले ते सर्व मुंबई, पुणे आणि इतर राज्यातून आलेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वगृही परतल्यानंतर याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली नाही. ते थेट स्वत:च्या घरी गेले. त्यांची आरोग्य तपासणी सुध्दा झाली नाही. त्यामुळेच कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. एकट्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात २६ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर सडक अर्जुनी तालुक्यात ५, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा १ रुग्ण आढळला आहे. आत्तापर्यंत आढळलेले सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातीलच असल्याने आता ग्रामीण भागात कोरोनाचे हाटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र आहे. यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाची अपडेट माहिती देण्याची जबाबदारी कुणाचीजिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून मागील तीन दिवसांपासून कोरोनाची अपडेट माहिती देण्यास विलंब केला जात आहे.सकाळी आलेल्या अहवालाची माहिती रात्री ९.३० वाजता दिली जाते. तर ज्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती देण्याची जबाबदारी सोपविली आहे ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा फोन उचलत नाही. शिवाय यासाठी तयार केलेल्या व्हाटसअ‍ॅप ग्रुपवर सुध्दा अपडेट देत नाही. त्यामुळे मोठा गोंधळ उडत असून यामुळे लोकांमध्ये सुध्दा काहीजण चुकीचे संदेश पाठवून दहशत निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे कोरोनाची अपडेट माहिती देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे हे कळण्यास मार्ग नाही.अधिकाऱ्यांना फोन उचलण्याची अ‍ॅलर्जीकोरोना संदर्भातील अचूक माहिती जनतेपर्यंत जावी, त्यामुळे गोंधळ निर्माण होवू नये यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी, नोडल अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील जबाबदार अधिकारी सुध्दा फोन उचलत नाही. आठ ते दहा वेळा फोन केल्यानंतरही साधा रिप्लाय दिला जात नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना फोन उचलण्याची अ‍ॅलर्जी झाली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.माहिती न देण्याचे फर्मान कुणाचे?आरोग्य विभाग किंवा कोरोना उपाययोजनेशी निगडीत कोणत्याही विभागाला माहिती घेण्यासाठी फोन लावल्यास माहिती न देण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले असल्याचे ते सांगतात. मात्र कोरोना अपडेट संदर्भातील वास्तविक माहिती देण्यास नेमकी अडचण काय तसेच विविध विभागांना माहिती न देण्याचे फर्मान नेमके कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे आहे किंवा संबंधित अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत हे समजण्यास मार्ग नाही.प्रशासन सुद्धा गोंधळलेजिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त असल्याने जिल्हा प्रशासन सुध्दा काहीसे सुस्त झाले होते. मात्र तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ३४ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाल्याने जिल्हा प्रशासनाची पूर्णपणे तारांबळ उडाली आहे. क्वारंटाईन सेंटरसह तेथे सुविधा निर्माण करुन देण्यावरुन सावळा गोंधळ कायम आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये सॅनिटायझर आणि मास्कचा अभाव असल्याची माहिती आहे. तर कोणते क्षेत्र नेमके बफर झोन आणि कंटोमेंट झोनमध्ये आहे याची माहिती प्रशासनच्या स्थानिक कर्मचाºयांना नसल्याने त्यांचीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस