दुबईहून येताना सोबत घेऊन आले कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:00:48+5:30
जिल्ह्यात १० जूनपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व कोरोना बाधित या कालावधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने पुन्हा एकदा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला होता. मात्र दुबईहून तिरोडा तालुक्यात परतलेल्या तीन जणांपैकी एकाच्या अहवाल शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला.

दुबईहून येताना सोबत घेऊन आले कोरोना
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व कोरोना बाधित रुग्ण १० जूनपर्यंत कोरोनामुक्त झाले होते. तर याच कालावधीत नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली नव्हती. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून एकत्र परतलेल्या तिरोडा तालुक्यातील तीन जणांचा स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दुबईहून येताना सोबत कोरोना घेवून आलेल्या तीन जणांमुळे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता ३ वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७२ वर पोहचली आहे.
जिल्ह्यात १० जूनपर्यंत नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. तर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले सर्व कोरोना बाधित या कालावधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याने पुन्हा एकदा जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. त्यामुळे जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला होता. मात्र दुबईहून तिरोडा तालुक्यात परतलेल्या तीन जणांपैकी एकाच्या अहवाल शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. तर याच व्यक्तीसह आलेला दुसरा व्यक्ती सुध्दा शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. याच तिघांपैकी तिसऱ्या व्यक्तीचा अहवाल रविवारी (दि.१४) कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुुळे जिल्ह्यातील एकूण अॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ३ वर पोहचला आहे. या तिन्ही कोरोना बाधित रुग्णांवर गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ७२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.
११४२ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यत जिल्ह्यातील एकूण १२५६ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ११४२ नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. तर आत्तापर्यंत ७२ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.४२ नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
बाहेरुन येणाऱ्यांमुळे वाढला धोका
जिल्ह्यात बाहेरील जिल्हा, राज्य आणि विदेशातून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिरोडा तालुक्यात दुबईहून परतलेल्या तीन जणांमुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच शिरकाव झाला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेरील जिल्हा, राज्य आणि विदेशातून येणाºयांवर लक्ष ठेवून त्याची वेळीच आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.