कोरोना पॉझिटिव्ह आहात... घाबरु नका, सावरुन घ्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:26+5:30

पीपीई किट घातलेले कर्मचारी चौकशी सुरु करतात गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात. परंतु याच तणावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आठवणीने रुग्णांच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते. घरातील इतरांना तातडीने स्त्राव देण्यासाठी नेण्याचा आग्रह सुरु होतो.

Corona are positive ... don't be afraid, recover ..! | कोरोना पॉझिटिव्ह आहात... घाबरु नका, सावरुन घ्या..!

कोरोना पॉझिटिव्ह आहात... घाबरु नका, सावरुन घ्या..!

ठळक मुद्देरुग्णांसाठी सूचना : रुग्णालयात दाखल होताना आवश्यक साहित्य घ्या, अनावश्यक धावपळ टाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायतीमधून तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात म्हणून तुम्हाला फोन येतो आणि घरातील वातावरण बदलून जाते. काय कराव सुचत नाही. घरातील अन्य सदस्य तर हबकलेलेच असतात, मग गोंधळून न जाता डोके शांत ठेवून रुग्णालयात दाखल होताना काय साहित्य घ्यायचे आहे याचा विचार करावा आणि ते साहित्य सोबत घ्यावे, अन्यथा नंतर हे साहित्य देण्यासाठी इतरांना धावपळ करावी लागते. तुमच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अर्ध्या तासातच तुमच्या गल्लीत यंत्रणा दाखल होते फवारणी सुरु होते. पीपीई किट घातलेले कर्मचारी चौकशी सुरु करतात गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात. परंतु याच तणावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आठवणीने रुग्णांच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते. घरातील इतरांना तातडीने स्त्राव देण्यासाठी नेण्याचा आग्रह सुरु होतो. त्यामुळे अन्य सदस्यही भांबावून जातात. म्हणूनच रुग्णवाहिका येण्याआधी आवश्यक साहित्य घेण्याची गरज असते.
कोरोना स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला की, धावपळ उडते आणि कोरोनाच्या रुग्णांसह नातेवाईक भांबावून जातात. रुग्णालयात दाखल होताना नेमके साहित्य काय घ्यावे आणि तिथे काय काळजी घ्यावी, याची माहिती खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी खास माहिती.

पॉझिटिव्ह रुग्णाने हे घ्यावे
ब्रश, पेस्ट, दंतमंजन, १०-१२ दिवसांसाठी लागणारे कपडे, एखादे बेडशीट, चादर, काही औषधे सुरु असतील तर ती घ्यावीत, आंघोळ व कपडे धुण्याचे साबण, तेल, कंगवा, गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक किटली किंवा थर्मास, काही फळे, बिस्कीट, सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्हज.

रुग्णाच्या घरातील सदस्यांसाठी आवश्यक
संस्थात्मक अलगीकरणामध्ये किमान ८-१० दिवस राहावे लागणार आहे. याची जाणीव ठेवून वरीलप्रमाणे आपले साहित्य घ्यावे, कारण त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तरी त्यांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये राहावे लागते. २-३ दिवसांनी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर स्थानिक प्रभाग समितीच्या पत्रानुसार हॉटेलमध्येही राहता येते. हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्यासाठी निगेटिव्ह अहवालाची प्रत व हॉटेल आरक्षित केल्याची पावती आवश्यक ठरते. घरी राहण्यासाठी निगेटिव्ह आल्याची प्रत व समितीच्या सचिवांच्या पत्राची गरज असते.

प्रशासनाने ही माहिती द्यावी
प्रशासनाकडून आलेल्या कर्मचाऱ्यांनी शांतपणे रुग्ण आणि नातेवाईकांना काय बरोबर घ्यावे, किती दिवस रहावे लागेल याची थोडक्यात माहिती देण्याची गरज आहे. ही माहिती दिल्यास ते रुग्ण आणि नातेवाईकांसाठी सोयीचे होणार आहे.


आधार व रेशन कार्डच्या झेरॉक्स
संबंधितांनी आधारकार्ड व रेशनकार्डच्या झेरॉक्स सोबत घेण्याची गरज आहे. डिस्चार्ज देताना महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी याची गरज पडू शकते. मोबाईलमध्ये आधार आणि रेशनकार्ड असले तरी प्रिंट कुठे काढायची असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Web Title: Corona are positive ... don't be afraid, recover ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.