वादग्रस्त व्यक्ती तंटामुक्त समितीवर राहणार नाही
By Admin | Updated: August 10, 2014 23:06 IST2014-08-10T23:06:06+5:302014-08-10T23:06:06+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त समितीवर येणाऱ्या प्रत्येक सदस्याला गावात सन्मानाने पाहिले जाते. यातच अध्यक्षाला अत्यंत मान दिला जात असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्तीही समितीवर येण्यासाठी

वादग्रस्त व्यक्ती तंटामुक्त समितीवर राहणार नाही
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त समितीवर येणाऱ्या प्रत्येक सदस्याला गावात सन्मानाने पाहिले जाते. यातच अध्यक्षाला अत्यंत मान दिला जात असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्तीही समितीवर येण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी त्या समितीवर गावातील सन्मानजनक व्यक्ती आरूढ होणे गरजेचे आहे. समितीत वादग्रस्त व्यक्तींचा अधिक शिरकाव होत असल्याने त्या व्यक्तीला बदलण्याचा अधिकार गावकऱ्यांना आहे. दरवर्षी समितीतील एक तृतीयांश सदस्य बदलता येते.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे संपूर्ण बदलता येत नाही. कवेळ एक तृतीयांश पदाधिकारीच बदलता येऊ शकतात. असा शासनाचा निर्णय आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्यात अध्यक्षपदावर चारित्र्यवान व्यक्ती यावा यासाठी चारित्र्यप्रमाणपत्राची अट लागू करण्यात आली.
पहिल्या ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षाची निवड करणे गरजेचे आहे. समितीच्या सभेला न येणारे, मोहीमेत सक्रीय नसणारे किंवा गावात नेहमी वादग्रस्त राहणारे व्यक्ती तंटे सोडविण्यात अपयशी ठरतील. असे पाहून शासनाने समितीतील एक तृतीयांश सदस्य बदलविता येईल असे सूचविले. एक तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य एकाचवेळी बदलविता येणार नाही. ग्रामसभेला आवश्यक वाटल्यास नव्या अध्यक्षाची निवड करता येऊ शकते. शासनाच्या निर्णयानुसार गावातील प्रतिष्ठित, प्रामाणिक, समजूतदार, सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नि:स्वार्थी व्यक्तींचा समितीमध्ये समावेश राहणार आहे. तंटामुक्त समितीमध्ये गुंडप्रवृत्ती, अवैधधंदे करणारे किंवा अवैध धंद्याचा पुरस्कार करणारे असामाजिक तत्वांना स्थान राहणार नाही, असे शासनाचे परिपत्रक सांगतो. समितीचा सदस्य चारित्र्यवान असावा त्यामुळेच गावाचा विकास होण्यास मदत होईल. (तालुका प्रतिनिधी)