चर्चासत्रात वैचारिक देवाणघेवाण
By Admin | Updated: December 20, 2014 22:42 IST2014-12-20T22:42:29+5:302014-12-20T22:42:29+5:30
येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात इलेक्टॉनिक्स, गणित आणि रसायसनशास्त्र विभागाच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे नोव्हेल सिंथेसीस आॅफ एडवांस मटेरियल, गणित विभागाचे इमर्जींग

चर्चासत्रात वैचारिक देवाणघेवाण
गोंदिया : येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात इलेक्टॉनिक्स, गणित आणि रसायसनशास्त्र विभागाच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे नोव्हेल सिंथेसीस आॅफ एडवांस मटेरियल, गणित विभागाचे इमर्जींग ट्रेंड अन क्रिप्टोलॉजी, कोडींग थिअरी अँड अलाईड टॉपिक्स तर रसायनशास्त्र विभागाचे मायक्रो स्केल टेकनिक्स इन केमीस्ट्री यावर विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन शनिवारी (दि.२०) सकाळी १० वाजता करण्यात आले होते.
राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी गोंदिया शिक्षण संस्थाचे सचिव आमदार राजेंद्र जैन होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पूर्व विभागाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस.व्ही. मोहरील, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू, रेल विकास प्राधिकरण बँगलोरचे मुख्य कार्यपालन अधिकारी एस.एस.गगरीन, श्री सत्य साई विद्यापीठाचे डॉ. नवीन चंद्रा, डॉ. जे.जी.महाखोडे, डॉ. एस.आर.त्रिवेदी, डॉ. हातझाडे उपस्थित होते.
सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून या चर्चासत्राची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार जैन यांनी, या राष्ट्रीय चर्चासत्रातून नावीन्यपूर्ण नअशा विविध विषयांना उजाळा मिळणार असून उपस्थितांना या संधीचे सोने करून घेण्याचे आवाहन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी, राष्ट्रीय चर्चासत्रा निमित्ताने महाविद्यालयात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. तर डॉ. त्रिवेदी यांनी आभार मारून उद्घाटन सभारंभाची सांगता केली.
त्यानंतर घेण्यात आलेल्या विविध तांत्रीक सत्रात देशाच्या विविध भागातून आलेल्या पाहुण्यांनी उपस्थितांना संबोधीत केले. यात इलेक्ट्रीनिक्स विभागात घेण्यात आलेल्या तीन तांत्रीक सत्रात पाहुण्यांनी आपापल्या विषयाला अनुसरून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याशिवाय गणित विभागाचे तांत्रीक सत्रही तीन सत्रात घेण्यात आले. याप्रसंगी संयोजन सचिव डॉ. त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेत कोडींग थिअरी, क्रिप्टोग्राफी व एलाईड टॉपीक्सवर चर्चा करण्यात आली.
या चर्चासत्राचे संचालन महाविद्यालयातील प्रा. धारणा टेंभरे व प्रा. गोविंद राठोड यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी काजल राघानी व आयूष अग्रवाल यांनी केले. आभार प्रा. डॉ. त्रिवेदी यांनी मानले.
या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नायडू यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)