एकता पॅनलचा विजयी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 01:06 IST2017-03-15T01:06:35+5:302017-03-15T01:06:35+5:30

जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व परिवर्तन पॅनल दरम्यान

Conquest of the Unity Panel | एकता पॅनलचा विजयी जल्लोष

एकता पॅनलचा विजयी जल्लोष

चुरशीची लढत : केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक
गोंदिया : जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल व परिवर्तन पॅनल दरम्यान झालेल्या चुरसीच्या लढतीत संघटनेच्या सर्वच पदांवर एकता पॅनलचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले.
अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडीत एकता पॅनलचे उत्पल शर्मा यांनी परिवर्तन पॅनलचे पुरूषोत्तम अग्रवाल यांचा १०५ मतांनी पराभव केला. सचिव पदासाठी सुशील शर्मा यांनी अनिल गंबानी यांचा १५९ मतांनी पराभव केला. उपाध्यक्ष पदासाठी राजेश अग्रवाल यांनी भास्कर बुडेकर यांचा १५६ मतांनी पराभव केला. कोषाध्यक्ष पदासाठी रूपेश रहांगडाले यांनी विनय अग्रवाल यांचा १५० मतांनी पराभव केला. टीआरसी कन्वेयर पदासाठी एकता पॅनलचे सुसेनजित शाह यांनी परिवर्तन पॅनलचे सचिन बडे यांचा १३९ मतांनी पराभव केला. सहसचिव पदासाठी ललीत सोनछात्रा यांनी भरत गंबानी यांचा १४४ मतांनी पराभव केला. संघटनेचे सचिव रूपेश तिवारी यांनी दिलीप कावडे यांचा १४४ मतांनी पराभव केला.
सदर निवडणुकीत एकता पॅनलचे मार्गदर्शक संजय कृष्णकुमार दुबे यांच्या मार्गदर्शनात एकता पॅनलने विजय मिळविला. विजयासाठी पॅनलचे रमेश शर्मा, निशांत गुप्ता, अजय अग्रवाल, श्याम येवले, सुनील गंगवानी, नवल चांडक, अनिल राठी, विकेश सोनछात्रा, मनोज पटनायक, पंकज अग्रवाल, डॉ. योगेश बडपईया, नरेंद्र दियेवार, रामसिंह भारद्धाज, निलकंठ लांजेवार, सुनील गोयल, हरीश संगतानी, प्रकाश पिथ्यानी, आनंद हसानी, कुमार गोपलानी, नितेश बिसेन, अतुल जायस्वाल, राजू बिंदल, नवीन अग्रवाल, संकेश रहांगडाले, राजेश चौरागडे, सुरेश मचाडे, कुलदीप भस्मे आदींनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: Conquest of the Unity Panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.