२०२१च्या समाविष्ट मतदार यादीत घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:54 IST2021-02-06T04:54:15+5:302021-02-06T04:54:15+5:30

देवरी : १५ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या शहरातील समाविष्ट मतदार यादीत मोठा घोळ असून, बोगस मतदारांचा यात समावेश झाल्याचे ...

Confusion in the included voter list of 2021 | २०२१च्या समाविष्ट मतदार यादीत घोळ

२०२१च्या समाविष्ट मतदार यादीत घोळ

देवरी : १५ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या शहरातील समाविष्ट मतदार यादीत मोठा घोळ असून, बोगस मतदारांचा यात समावेश झाल्याचे निदर्शनास आले आहे. यावर तालुका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांना निवेदन देत शहरात वास्तविक वास्तव्य करणाऱ्या लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून इतरांची नावे वगळण्यात यावी व निर्दोष मतदार यादी प्रसिध्द करावी, अशी मागणी केली आहे.

प्रकाशित मतदार यादीत इतर गावांतील मतदारांची नावे येथील वेगवेगळ्या प्रभागांत समाविष्ट करण्यात आली असून, एकाच व्यक्तिला दोन ठिकाणी कसे मतदान करता येईल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे काही मतदार हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेले असून, त्यांचे नाव शहरातील वेगवेगळ्या प्रभागांतदेखील बघावयास मिळत आहे. त्यामुळे मतदार यादीवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. नगर पंचायत निवडणुकीत अपेक्षित उमेदवाराला फायदा पोहोचविण्यासाठी अपेक्षित प्रभागात नाव यावे म्हणून बहुतांश मतदारांनी जाणीवपूर्वक आपले नाव एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याचे निवेदनात नमूद केले आहे. येथील समाविष्ट मतदार यादीत सुमारे ५००पेक्षा अधिक बोगस मतदारांची भरती झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. याकरिता शहरात वास्तविक वास्तव्य करणाऱ्या लोकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावे व इतरांची नावे वगळण्यात यावीत. निर्दोष मतदार यादी प्रसिध्द करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात तालुकाप्रमुख सुनील मिश्रा, शहरप्रमुख राजा भाटिया, विधानसभा संघटक प्रमुख राजीक खान, शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख अनिल कुर्वे, शहरप्रमुख सुभाष दुबे, प्रचार प्रसार प्रमुख डॉ. भूपेश पटले, शहर समन्वयक परवेज पठाण, उपशहर प्रमुख महेश फुन्ने, कृष्णा राकडे, विलास राऊत, संजय भांडारकर, दिनदयाल मेश्राम व माणिक राऊत आदींचा यात समावेश होता.

Web Title: Confusion in the included voter list of 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.