शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली; पीएम किसानचे अनुदान संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:32 IST

एक लाख ७९ हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडी : फार्मर आयडी नोंदणीत गोंदिया तालुका आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २ लाख २० हजार ९५ लाभार्थ्यांपैकी अजूनही ४० हजार ४३३हून अधिक शेतकऱ्यांनी आवश्यक 'फार्मर आयडी' तयार केलेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०१९पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, तर राज्य शासनाने २०२३-२४ पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अमलात आणली आहे. यासाठी आता 'फार्मर आयडी' आवश्यक करण्यात आला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात २ लाख २० हजार ९५ शेतकरी पात्र आहेत. १२ जुलैपर्यंत १ लाख ७९ हजार ४३३ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे. अजूनही ४० हजार ४३३ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. अन्यथा अनुदानाच्या पुढील हप्त्याला मुकावे लागण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांना करावी लागणार त्वरित नोंदणीपीएम किसान सन्मान निधी योजनेचे जिल्ह्यात २ लाख २० हजार पात्र लाभार्थी आहेत. यापैकी १ लाख ७९ हजार ४३३ लाभार्थ्यांची फार्मर आयडीसाठी नोंदणी झाली आहे, तर अद्याप ४० हजार शेतकरी नोंदणीपासून दूर आहेत. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी या शेतकऱ्यांना फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी नोंदणीची प्रक्रिया त्वरित करावी लागणार आहे.

फार्मर आयडीत गोंदिया तालुका आघाडीवर

  • गोंदिया जिल्ह्यात फार्मर आयडी तयार करण्यात गोंदिया तालुक्यातील शेतकरी आघाडीवर आहेत.
  • या तालुक्यातील एकूण ५१,६७१ पात्र शेतकऱ्यांपैकी ४५,३१४ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे. काही शेतकऱ्यांचे अर्ज प्रक्रियेत आहेत.

 

"शासनाच्या योजना व उपक्रमांचा लाभघेण्यासाठी 'फार्मर आयडी'ला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. तसेच यापुढे सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दखल घेत फार्मर आयडी तयार करून घ्यावी."- प्रजीत नायर, जिल्हाधिकारी गोंदिया

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाfarmingशेतीFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया