रस्त्याचे अपूर्ण बांधकाम त्वरित पूर्ण करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:33 IST2021-09-15T04:33:45+5:302021-09-15T04:33:45+5:30

गोरेगाव : शहरातील सर्व व्यापारी वर्ग व जनतेच्या ऑनलाईन पद्धतीने प्राप्त निवेदनाची दखल घेत माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी ...

Complete unfinished road construction now () | रस्त्याचे अपूर्ण बांधकाम त्वरित पूर्ण करा ()

रस्त्याचे अपूर्ण बांधकाम त्वरित पूर्ण करा ()

गोरेगाव : शहरातील सर्व व्यापारी वर्ग व जनतेच्या ऑनलाईन पद्धतीने प्राप्त निवेदनाची दखल घेत माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी गोरेगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे अपूर्ण बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग नागपूर विभागाचे कनिष्ठ अभियंता दीपक चव्हाण यांच्याशी चर्चा केली. तसेच बसस्थानकाच्या जागेबाबत सुद्धा नियमानुसार निर्णय घेण्याबाबत निवेदन दिले.

सध्या शहरात रस्त्याचे बांधकाम बंद आहे. त्यामुळे व्यापारीसह वाहन चालक ही त्रस्त आहेत. रस्त्याच्या बंद कामामुळे अनेक व्यावसायिकाचा व्यापार मंदावला आहे. तर दररोज शहरातील मुख्य चौकात वाहतुकीचा खोळंबा उडतो. या गंभीर प्रश्नाकडे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी लक्ष वेधून शहरातील रस्त्याचे बांधकाम लवकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता दीपक चव्हाण यांना निवेदन दिले.

Web Title: Complete unfinished road construction now ()