जिल्ह्यातील ६३ गावांत ३७८ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:21 IST2017-09-15T22:20:26+5:302017-09-15T22:21:43+5:30

शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत सन २०१७-१८ साठी जिल्ह्यातील एकूण ६३ गावे निवडण्यात आली.

Complete 378 works in 63 villages in the district | जिल्ह्यातील ६३ गावांत ३७८ कामे पूर्ण

जिल्ह्यातील ६३ गावांत ३७८ कामे पूर्ण

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान : सन २०१७-१८ मध्ये १.९३ कोटींचा खर्च

देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत सन २०१७-१८ साठी जिल्ह्यातील एकूण ६३ गावे निवडण्यात आली. या ६३ गावांमध्ये आतापर्यंत एकूण ३७८ कामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर एक कोटी ९३ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला.
यावर्षी आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांमध्ये कृषी विभागाने २९९ व पंचायत समित्यांनी ७९ अशी एकूण ३७८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यात माती नालाबांध दुरूस्ती व गाळ काढणे यासारखी ६३ कामे करण्यात आली. सिमेंट बंधारा, दुरूस्ती व गाळ काढणे अशी ३ कामे पूर्ण झालेली आहेत. नाला खोलीकरण व सरळीकरणाची ७१ कामे पूर्ण झाली असून त्यावर ०.५९ कोटी रूपये खर्च करण्यात आला. तर कालवा दुरूस्तीचे केवळ एक काम करण्यात आले असून त्यावर ०.०५ कोटी रूपये खर्च करण्यात आले. भातखाचरे दुरूस्तीची ९५ कामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर ०.७१३ रूपये खर्च करण्यात आले आहेत. तर बोडी खोलीकरण व जुनी बोडी दुरूस्तीचे ९८ कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय तलाव खोलीकरण व तलाव दुरूस्तीची ११ कामे पूर्ण करण्यात आली असून त्यावर ०.५७ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. यावर्षी जिल्ह्यात अशी एकूण ३७८ कामे आतापर्यंत पूर्ण करण्यात आली असून त्यावर १.९३ कोटी रूपये खर्च झाले आहेत.
जलयुक्त शिवार अभियानाची प्रस्तावित कामे
सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात एकूण दोन हजार १८६ कामे प्रस्ताविक करण्यात आली असून त्यासाठी ८७४६.१९ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात कृषी विभागाच्या एक हजार ३४६ कामांसाठी ३१०९.२२ लाख, लघू पाटबंधारे जि.प.च्या २०९ कामांसाठी २३०३.४० लाख, पंचायत समित्यांच्या १५४ कामांसाठी ८२४.२६ लाख, लघू पाटबंधारे जलसंधारणच्या ४७ कामांसाठी ९२३ लाख, वन विभागाच्या २७० कामांसाठी १२३४.११ लाख व जि.प. ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या १६० कामांसाठी ३५३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Complete 378 works in 63 villages in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.