जिल्ह्यात संचारबंदी कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:34+5:30
देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आहे. हीच बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी संबोधित करत रविवारी (दि.२२) देशात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते.

जिल्ह्यात संचारबंदी कायम!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२२) पुकारलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतरही राज्यातील कित्येक जिल्ह्यांत सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन करण्यात आले. याची दखल घेत जिल्ह्यातही नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे टाळले. तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानी बंद ठेवल्याचे दिसले. परिणामी सोमवारीही (दि.२३) जिल्ह्यात संचारबंदी कायम दिसली.
देशासह राज्यात कोरोनाने शिरकाव केला असून दिवसागणीक रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव व रूग्णांची संख्या बघता शासनाची धावपळ वाढली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता लोकांचे एकमेकांच्या संपर्कात येणे टाळणे गरजेचे झाले आहे. हीच बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी संबोधित करत रविवारी (दि.२२) देशात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. खुद्द पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनावरून प्रसंगाचे गांभीर्य बघत देशवासीयांना रविवारी (दि.२२) कडकडीत बंद पाळून ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद दिला.
रविवारच्या या ‘जनता कर्फ्यू’ नंतरही रूग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेत शासनाने देशातील कित्येक राज्यांत लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यानुसार, महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी केले जात असल्याचे बघत जिल्हावासीयांनीही स्वेच्छेने प्रतिसाद देत सोमवारी (दि.२३) ‘जनता कर्फ्यू’ पाळला. यांतर्गत नागरिकांनी सकाळपासूनच घराबाहेर निघणे टाळत घरीच राहण्यास पसंती दर्शविली. शिवाय व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून या आपत्तीत आपला सहभाग नोंदविला. सोमवारी (दि.२३) जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हेच चित्र दिसून आले. तर तुरळक प्रमाणात नागरिक घराबाहेर दिसून आले.
जिल्ह्यातील ६२८ जण निगरानीखाली
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर कोरोनामुळे विदेशात वास्तव्यास असणारे अनेकजण स्वगृही परतत आहे. सोमवारपर्यंत (दि.२३) विदेशातून एकूण १२१ जण जिल्ह्यात परतले आहेत. यासर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ५०८ अशा ६२८ जणांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे सर्वजण प्रशासनाच्या निगरानीखाली आहेत.
बाहेरील देशातून कामानिमीत्त देशात येणाºयांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर जिल्हास्तरावर सुद्धा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे. विदेशातून जिल्ह्यात परतणाºया नागरिकांची नोंदणी केली जात आहे. त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे.
विदेशात असलेले १२१ जण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची ५ जणांना लक्षणे दिसली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्या ५ जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकही संशयीत किंवा बाधीत रूग्ण नाही.