जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:14+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरात दीडशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. याला वेळीच पायबंद लावला नाही तर शहरातील स्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या दौºयावर आले असता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना युध्द पातळीवर राबवण्यिाचे निर्देश दिले होते.

जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग होवून त्याची माहिती नगर परिषद आणि आरोग्य प्रशासनाला न देताच घरी राहणाऱ्या कोरोना बाधितांवर धडक कारवाई करण्यास रविवारी (दि.२७) जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. जिल्हाधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, विभागप्रमुखांच्या नेतृत्त्वातील १६ पथकांनी रविवारी सकाळपासूनच शहरातील विविध भागाला थेट भेट देत माहिती लपविणाऱ्या ८७ कोरोना बाधितांना नोटीस बजाविली. तसेच प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या धडक कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरात दीडशेहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. याला वेळीच पायबंद लावला नाही तर शहरातील स्थिती आणखी बिघडू शकते. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे जिल्ह्याच्या दौºयावर आले असता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना युध्द पातळीवर राबवण्यिाचे निर्देश दिले होते.तसेच शासनातर्फे माझे कुटुंब माझी जवाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. शहरातील कोरोनाची बिघडत चाललेली परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा हे आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह स्वत: मैदानात उतरत रविवारपासून धडक कारवाईची मोहीम सुरू केली. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील श्रीनगर, कुंभारेनगर परिसराला भेट देत कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर याची माहिती नगर परिषद आणि आरोग्य विभागाला न देता होम क्वारंटाईन असणाऱ्या कोरोना बाधितांच्या घरी भेट देत त्यांना १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली. होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर दंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाईस तयार राहण्याचा इशारा दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक मोहीमेमुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. शहरावासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुरू केलेल्या मोहीमेचे स्वागत केले.
शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जवाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभुमीवर कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी माझा जिल्हा माझी जवाबदारी या धर्तीवर धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सातत्याने राबविण्यात येईल.
- दीपककुमार मीणा, जिल्हाधिकारी गोंदिया
.........................................................................
शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोनाची माहिती लपविणाºया रुग्णांमुळे परिस्थिती आणखी बिघडत आहे. याला वेळीच पायबंद लावून परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी दीपककुमार मीणा यांच्या नेतृत्त्वात धडक मोहीम सुरू केली आहे. यातंर्गत माहिती लपविणाऱ्या कोरोना बाधितांच्या घरी भेट देऊन त्यांना १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली जात आहे.
- वंदना सवरंगपते, उपविभागीय अधिकारी.
एकाच दिवशी एकाच वेळी १६ पथकांची कारवाई
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा पार्श्वभुमीवर रविवारी जिल्हा प्रशासन मैदानात उतरत अप्पर जिल्हाधिकाºयांपासून ते नगर परिषद मुख्याधिकाºयांचा समावेश असलेल्या अधिकाºयांचे १६ भरारी पथके तयार करुन शहरातील वेगवेगळ्या भागात एकाच वेळी कारवाई करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही याची माहिती नगर परिषद आणि आरोग्य विभागापासून लपवून होम क्वारंटाईन असणाºया ८७ बांधितांच्या घरी धडक देत १० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली. तसेच दंड न भरल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला.
१२०० कोरोना बाधितांनी दडवली माहिती
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागील कारण बाधित आल्यानंतर त्याची माहिती लपविणे हे देखीेल आहे. शहरातील जवळपास १२०० कोरोना बाधितांची पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची माहिती आरोग्य विभाग आणि नगर परिषदेला दिली नसल्याची माहिती आहे.