कापड दुकानदाराला लुटले

By Admin | Updated: July 19, 2015 01:30 IST2015-07-19T01:30:28+5:302015-07-19T01:30:28+5:30

कापड दुकानात शिरून तिघांनी दुकान मालक व नोकरांना मारहाण करून कापड व रोख चार हजार ३०० रूपये हिसकावून नेले.

The cloth robbed the shopkeeper | कापड दुकानदाराला लुटले

कापड दुकानदाराला लुटले

मरारटोलीतील घटना : तिघांवर गुन्हा दाखल
गोंदिया : कापड दुकानात शिरून तिघांनी दुकान मालक व नोकरांना मारहाण करून कापड व रोख चार हजार ३०० रूपये हिसकावून नेले. शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी ५ वाजता दरम्यान रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत मरारटोली येथे ही घटना घडली.
बसस्थानकाजवळील लक्की ऊर्फ सुनील मुरजानी (१८) हे आपल्या दुकानातील नोकरांसोबत असताना संदीप करीयार, डॉसू फाडन व त्यांचा एक मित्र अशा तिघांनी दुकानात जाऊन कपडे दाखविण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी लक्की व दुकानातील इतरांना मारहाण केली. तसेच दुकानातील चार शर्ट, चार लोअर, पँट पीस, चार जीन्स, चार रेनकोट, चार कॉलेज बॅग, पाच अंडरवियर असा नऊ हजार रूपयांचा माल व चार हजार ३०० रूपये रोख असा एकूण १३ हजार ३०० रूपयांचा माल पळविला. रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३९४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The cloth robbed the shopkeeper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.