शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक कामांवर राबताहेत बालमजूर

By admin | Updated: May 9, 2015 01:31 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जात असले तरी जिल्ह्यातील अनेक चिमुकले विविध ठिकाणी राबताना दिसतात.

गोंदिया : शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जात असले तरी जिल्ह्यातील अनेक चिमुकले विविध ठिकाणी राबताना दिसतात. अनेक मुले तर धोकादायक कामांवर आई-वडिलांसोबत काम करताना दिसतात. गुमास्ता नियमांचे उल्लंघन होत असून संबंधित विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात कामाला ठेवणे, त्यांच्याकडून काम करून घेणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र शहरात सर्रास बाल कामगारांकडून लहानमोठी कामे करवून घेतली जात आहे. प्रशासनासमोर लहान मुले काम करताना दिसत असताना कोणतीही कारवाई मात्र केली जात नाही. शहरातील हॉटेल, चहा टपऱ्या, कापड दुकान, किराणा दुकान, पाणीपुरी स्टॉल, थंड पेयाची दुकाने यासह अनेक ठिकाणी बालमजूर राबत आहे. एवढेच नव्हे तर वीटभट्टयांवरही बालमजूर आई-वडिलांसोबत राबताना दिसत आहे. गारा तुडविणे यासह ओल्या विटा वाहून नेणे आदी कामे ही मुले करताना दिसून येतात.अनेक दुकानात ‘येथे बालकामगार राबत नाही’ असे फलक लावलेले असतात. मात्र त्याच दुकानात लहान मुले काम करताना दिसून येतात. बालवयात त्यांच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हॉटेल व बारमध्ये ग्राहकांकडून अपशब्द त्यांना ऐकावे लागतात. यातून त्यांची मानिसकता खच्चीकरण होण्याची शक्यता असते. अनेकदा या मुलांना पेलवणार नाही, अशी कामे सक्तीने करवून घेतली जातात. मुलांना कामावर राबविणे गुन्हा असला तरी व्यापारी पैसे वाचविण्याच्या नादात लहान मुलांना कामावर ठेवतात. मोठया व्यक्तीला अधिक पैसे द्यावे लागते. तो मन लावून काम करेल याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे दुकानांमध्ये लहान मुलांनाच पसंती दिली जाते. चहाच्या दुकानात तर हमखास बालकामगार राबताना दिसून येतात. याप्रमाणेच बालकांना गॅरेजवरही हेल्पर म्हणून राबविले जाते. त्यांच्या भवितव्याची वाढ येथेच खुंटविण्यात येते. मटका व जुगार अड्ड्यांवरही अल्पवयीन मुलांचा वावर असतो. अशा धोकादायक व बालमनावर दुरोगामी परिणाम करणाऱ्या व्यवसायांमध्ये ही मुले हकनाक लोटली जात आहे. बालमजूरी थांबविण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत असले तरी यश मात्र येत नाही. अनेक ठिकाणी यंत्रणेतील उदासिन अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे शेकडो चिमुकले धोकादायक व्यवसायात राबताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)