एक कोटी ७० लाखांचा धनादेश वटलाच नाही

By Admin | Updated: September 4, 2014 23:53 IST2014-09-04T23:53:20+5:302014-09-04T23:53:20+5:30

प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन देण्यासाठी जिल्हा परिषगदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी ३ सप्टेंबर रोजी दिलेला धनादेश दुसऱ्या दिवशी वटलाच नाही. यामुळे शिक्षकांमध्ये तिव्र असंतोष

The check of one crore 70 lakhs has not been received | एक कोटी ७० लाखांचा धनादेश वटलाच नाही

एक कोटी ७० लाखांचा धनादेश वटलाच नाही

जि.प.चा धनादेश : शिक्षकांच्या वेतनाचा होता तो धनादेश
गोंदिया : प्राथमिक शिक्षकांचे जुलै महिन्याचे वेतन देण्यासाठी जिल्हा परिषगदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी ३ सप्टेंबर रोजी दिलेला धनादेश दुसऱ्या दिवशी वटलाच नाही. यामुळे शिक्षकांमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत गोरेगाव पंचायत समितीत ४०० च्या जवळपास प्र्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचे जुलै महिन्याचे वेतन १ तारखेला देणे आवश्यक होते. मात्र ते देण्यात आले नाही. यावर शिक्षक संघाने सतत पाठपुरावा केल्यामुळे ३ स्प्टेंबर रोजी धनादेश क्र. ८५९०५१ हा एक कोटी ७० लाख ४० हजार ८१५ रूपयांचा देण्यात आला. गोरेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी धनादेश वटविण्यासाठी गोरेगावच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पाठविला असता जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यात फक्त ४४ लाख रूपये जमा असल्याचे बँकेकडून कळले. त्यामुळे तो धनादेश वटू शकला नाही. जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक तालुक्याला जुलै महिन्याचे शिक्षकांचे वेतन करण्यासाठी धनादेश देण्यात आले. परंतु आमगाव व गोरेगाव या दोन तालुक्यातील धनादेश वटलेच नसल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, केदार गोटेफोडे, नूतन बांगरे, अयुब खान, शंकर चव्हाण, डी.डी.बिसेन, पी.के खोब्रागडे, प्रकाश कुंभारे, ए.आर. धुर्वे, यशोधरा सोनवाने, नागसेन भालेराव, अनिरूध्द मेश्राम, गणेश चुटे यांनी या प्रकाराचा तिव्र असंतोष व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे शिक्षक संघटना शिक्षकांच्या वेतनासाठी प्रत्येक महिन्याला जिल्हा परिषदेच्या चकरा मारते. त्याशिवाय त्यांना वेतनच मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The check of one crore 70 lakhs has not been received