स्वच्छ प्रतिमेसह निवडून येण्याची क्षमता तपासणार
By Admin | Updated: October 29, 2016 01:13 IST2016-10-29T01:13:33+5:302016-10-29T01:13:33+5:30
आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने पूर्ण ताकदनिशी उमेदवाराला रिंगणात उतरविले जाईल.

स्वच्छ प्रतिमेसह निवडून येण्याची क्षमता तपासणार
नगर परिषद : काँग्रेसचे निरीक्षक अग्निहोत्री यांची माहिती
तिरोडा : आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने पूर्ण ताकदनिशी उमेदवाराला रिंगणात उतरविले जाईल. न.प.अध्यक्ष काँग्रेसचाच असावा यासाठी स्वच्छ प्रतिमा व निवडून येण्याची ताकद असणाऱ्या व्यक्तीलाच पक्षाचे तिकीट दिले जाईल, अशी माहिती तिरोडा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे प्रभारी उमाकांत अग्निहोत्री (नागपूर) यांनी काँग्रेस भवनातील कार्यक्रमात दिली.
तिरोडा शहर काँग्रेस कमिटी व तिरोडा शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली, विधानसभा प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, डॉ.योगेंद्र भगत, जि.प.सभापती पी.जी.कटरे, तालुका अध्यक्ष राधेलाल पटले, उषा शहारे, पूनम रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.
यावेळी पक्ष संघटन व आगामी नगर परिषद निवडणूक यावर मार्गदर्शक करण्यात आले. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी न.प.निवडणुकीत मी जास्तीत जास्त वेळ देवून काँग्रेससाठी काम करणार, असे सांगितले. इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन माणिक झंझाळ, प्रास्ताविक दिलीपकुमार असाटी तर आभार रुबीना मोतीवाला यांनी मानले.
(तालुका प्रतिनिधी)