तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

By Admin | Updated: October 29, 2016 01:26 IST2016-10-29T01:26:40+5:302016-10-29T01:26:40+5:30

शेती हा प्रमुख व्यवसाय असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे.

In charge of the charge of the Taluka Agricultural Office, in charge | तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

तालुका कृषी कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

तुमसर : शेती हा प्रमुख व्यवसाय असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे. तुमसर तालुक्यात तालुका कृषी अधिकारी पद मागील एका वर्षापासून रिक्त असून प्रभारींच्या खांद्यावर सध्या कारभार सुरु आहे. राज्य शासनाची यास अनास्था म्हणजे काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
तुमसर शहर व ९७ ग्रामपंचायतीचा समावेश तुमसर तालुक्यात होतो. भंडारा जिल्ह्यात क्रमांक दोनचा तुमसर तालुका आहे. धानाचे कोठार म्हणून तुमसर तालुक्याची राज्यात ओळख आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय येथे आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता कृषी कार्यालय येथे आहे. परंतु मागील एका वर्षापासून तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे.तालुक्यातील ३५ ते ४० कि.मी. अंतरावरून शेतकरी तथा लोकप्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात मार्गदर्शनाकरिता येतात. तेव्हा त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट होत नाही. रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
आठवड्यातून दोन ते तीन दिवस ते तुमसर येथे उपस्थित राहतात, तर उर्वरीत दिवस ते गोरेगाव येथे कृषी कार्यालयात बसतात. गोरेगाव जि. गोंदिया येथे त्यांची पदस्थापना आहे. गोरेगाव ते तुमसर सुमारे ७५ कि.मी. त्यांना प्रवास करावा लागतो.
भंडारा व गोंदिया येथे जिल्हास्तरीय बैठकांना त्यांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे कार्यालयात त्यांची उपस्थिती कमी असते. तुमसर येथील कृषी कार्यालयात मोठा कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. परंतु प्रमुख अधिकारी उपस्थित राहू शकत नसल्याने कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. राज्य शासनाच्या अनेक कृषीच्या योजना आहेत .उपक्रम राबविणाऱ्या प्रमुख तालुका पातळीच्या अधिकाऱ्यांची कायमस्वरुपी अधिकारी का मिळत नाही हा संशोधनाचा विषय आहे.यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांनी राज्याचे कृषीमंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

Web Title: In charge of the charge of the Taluka Agricultural Office, in charge