गाव शाळा पातळीवर मिळणार प्रमाणपत्र
By Admin | Updated: August 3, 2014 23:27 IST2014-08-03T23:27:33+5:302014-08-03T23:27:33+5:30
सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र महसूल प्रशासन लोकाभिमूख व गतीमान करण्यासाठी शासनाने राजस्व अभियानांतर्गत गाव शाळा पातळीवर नागरिकांना महत्वपूर्ण प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कार्यक्रम

गाव शाळा पातळीवर मिळणार प्रमाणपत्र
राजस्व अभियान : ५ आॅगस्टपासून कार्यक्रम
आमगाव : सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र महसूल प्रशासन लोकाभिमूख व गतीमान करण्यासाठी शासनाने राजस्व अभियानांतर्गत गाव शाळा पातळीवर नागरिकांना महत्वपूर्ण प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आमगाव तालुक्यात ५ आॅगस्टपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी विद्यार्थी व पालकांना तहसिल कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यात कधी संबंधीत कर्मचारी तर कधी साहेब नसल्याचे कारम पुढे केले जाते. यामुळे विद्यार्थी व पालकांना कागदपत्रांसाठी त्रास सहन करावा लागतो. या सर्व प्रकार संपुष्टात यावा हा उद्देश पुढे ठेऊन आता आवश्यक ते प्रमाणपत्र शाळा पातळीवर देण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. यासाठी तालुकास्तरावर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून यात ५ आॅगस्ट रोजी राणी लक्ष्मीबाई हायस्कुल व जिल्हा परिषद हायस्कुल कट्टीपार, ७ आॅगस्ट रोजी स्व. राधादेवी हायस्कुल बोरकन्हार, ११ आॅगस्ट रोजी इंदिरा गांधी हायस्कुल कालीमाटी, १३ आॅगस्ट रोजी जगत हायस्कुल व गजानन हायस्कुल घाटटेमनी, १६ आॅगस्ट रोजी श्री तुकाराम हायस्कुल भोसा, १९ आॅगस्ट रोजी जिवनज्योती हायस्कुल कातुर्ली, २१ आॅगस्ट रोजी निशांत हायस्कुल शिवणी, २५ आॅगस्ट रोजी संत जैरामदास हायस्कुल ठाणा, २७ आॅगस्ट रोजी गुरुकृपा आदिवासी आश्रमशाळा ठाणा, ३० आॅगस्ट रोजी मिलिंद विद्यालय गोरठा या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर दोन टप्यात राहणार असून दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला आहे.
शिबिरात तलाठी, मंडळ निरीक्षक व नायब तहसीलदार उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आवश्यक प्रमाणपत्रासाठी कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे, असे आवाहान तहसीलदार राजीव शक्करवार यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)