तेलगंणातील ‘त्या’ युवकांशी सीईओंनी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:00+5:30
दयानिधी यांनी त्यांच्यासाठी पुरविण्यात येत असलेल्या जेवणाचाही आस्वाद त्यांनी घेतला. युवकांना खालसा ग्रुप गोंदिया या सामाजिक संस्थेकडून सकाळ आणि सायंकाळचे भोजन पुरविले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. दुसरीकडे मजुरांनी स्थलांतरण करू नये, यासाठी शासनाकडून अडकलेल्या मजुरांची व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहे.

तेलगंणातील ‘त्या’ युवकांशी सीईओंनी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देश व राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. २३ मार्च रोजी संचारबंदी लागू झाल्याने आंध्रप्रदेश व तेलंगणा या दोन राज्यातील जवळपास १५० युवक गोंदियात अडकले होते. दरम्यान २५ मार्च रोजी त्यांनी गोंदिया येथून परतीचा प्रवास सुरू केला.मात्र,गोरेगाव येथे त्यांना थांबवून जि.प.शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली. रविवारी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शाळेला भेट देवून त्या १५० युवकांशी तेलगू भाषेत संवाद साधून त्यांचे समूपदेशन केले.
दयानिधी यांनी त्यांच्यासाठी पुरविण्यात येत असलेल्या जेवणाचाही आस्वाद त्यांनी घेतला. युवकांना खालसा ग्रुप गोंदिया या सामाजिक संस्थेकडून सकाळ आणि सायंकाळचे भोजन पुरविले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली. दुसरीकडे मजुरांनी स्थलांतरण करू नये, यासाठी शासनाकडून अडकलेल्या मजुरांची व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहे.
२५ मार्च रोजी गोरेगाव येथे आंध्रप्रदेश व तेलंगणा या दोन प्रदेशाच्या परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या १५० युवकांना थांबविण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषद शाळेत त्यांची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तुंचाही पुरवठा आवश्यकतेनुसार यंत्रणेकडून केला जात आहे. गोरेगाव नगरपंचायत, तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून त्या युवकांची खबरदारी घेतली जात आहे. रविवारी सीईओ दयानिधी यांनी युवकांशी तेलगू भाषेत संवाद साधून त्यांच्या आपुलकी निर्माण केली.
या वेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपडे, प्रभारी तहसीलदार वेदी, मुख्याधिकारी हर्षला राणे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, अपंग समावेशित विभागाचे समन्वयक विजय ठोकणे, शिक्षण विभाग तसेच आरोग्य, नगर पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.